'गोवा कला महाविद्यालयाच्या प्राचार्यांची नियुक्ती होण्याआगोदरच विवाद'

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 13 फेब्रुवारी 2021

गोवा कला महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी  नियुक्ती होण्याआधीच त्यावरून वाद निर्माण होणे सुरू झाले आहे.

पणजी: गोवा कला महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी नियुक्ती होण्याआधीच त्यावरून वाद निर्माण होणे सुरू झाले आहे. या पदावर नियुक्तीसाठी पात्रता असूनही आपल्याला डावलले गेल्याचा आरोप शिवाजी शेट यांनी आज आझाद मैदानावर पत्रकारांशी बोलताना केला. यांनी अलीकडेच स्वातंत्र्यसैनिकांच्या पाल्यांनाच्या आंदोलनाचे नेतृत्व केले होते. त्यांच्या आंदोलनामुळे सरकारला झुकावे लागले होते. सरकारने 31 मार्च पर्यंत स्वातंत्र्यसैनिकांच्या पाल्यांना सरकारी सेवेत घेण्याचे आश्वासन दिले. त्यानंतरच स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांनी आणि स्वतंत्र सैनिक आणि सुरू केलेले बेमुदत उपोषण मागे घेतले होते.

गोवा पालिका निवडणुक: "यांना मंत्रिमंडळातून काढून टाका"

ही सारी पार्श्वभूमी कथन करून यांचे म्हणणे आहे की या आंदोलनाचे आपण नेतृत्व केले याचा राग सरकारने काढला आहे. गोवा कला महाविद्यालयाच्या प्राचार्य पदासाठी राज्यात आपण एकमेव लायक व्यक्ती असताना राज्याबाहेरील व्यक्तीची नियुक्ती या पदावर करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सरकार विरोधी आंदोलन केले म्हणून मला या पदाच्या नियुक्तीच्या यादीतून वगळण्यात आले असे डॉ शेट यांचे म्हणणे आहे.

संबंधित बातम्या