सहकारमंत्री गोविंद गावडे सरकारकडे ठेवणार गोवा सहकार भूषण पुरस्काराचा प्रस्ताव

सहकारमंत्री गोविंद गावडे सरकारकडे ठेवणार गोवा सहकार भूषण पुरस्काराचा प्रस्ताव
Cooperative societies should extend a helping hand to the working and farming community Cooperation Minister Govind Gawde

पणजी - राज्यातील सहकार क्षेत्राच्या चळवळीत झोकून देऊन उत्कृष्ट कामगिरी करत असलेल्या सहकार समाजकार्यकर्त्यांसाठी, गोवा सहकार श्री, गोवा सहकार रत्न व गोवा सहकार भूषण पुरस्काराचा प्रस्ताव सरकारकडे ठेवणार असल्याची घोषणा सहकारमंत्री गोविंद गावडे यांनी आज पणजीत झालेल्या राष्ट्रीय सहकार सप्ताहाच्या समारोप समारंभात बोलताना केली.

सहकार चळवळीचा कणा ताठ व मजबूत होण्यासाठी सहकारी संस्थांनी कष्टकरी व शेतकरी समाजाला मदतीचा हात देण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 


भारतीय राष्ट्रीय सहकारी संघ व गोवा राज्य सहकारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने १४ ते २० नोव्हेंबर या काळात विविध भागात सहकार
सप्ताह पाळण्यात आला. यावेळी व्यासपीठावर गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष दयानंद सोपटे व इतर मान्यवर उपस्थित होते.


यावेळी सहकारमंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते उत्कृष्ट सहकार समाजकार्यकर्त्यांना पुरस्कार वितरण करण्यात आले. - दामोद नाईक (प्रियोळ, म्हार्दोळ), उत्कृष्ट अध्यक्ष - दत्तात्रय नाईक, जी. व्ही. एम. कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादीत फोंडा. उत्कृष्ट संस्था - भंडारी सहकारी पतसंस्था (पणजी) उत्कृष्ट सचिव - लीना शिरोडकर, नावेली विकास सेवा सोसायटी, नावेली साखळी, उत्तेजनार्थ पुरस्कार - श्री माऊली दूध उत्पादक सहकारी संस्था मर्यादीत, विर्नोडा. शिखर बॅंक कर्मचारी सहकारी पतसंस्था, पाटो - पणजी. मल्लिकार्जुन सहकारी दूध व्यावसायिक संस्था, भाटी - सांगे यां सर्व सहकाऱ्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com