"कोर्डेलिया क्रुझ"ला एमपीटी बंदरात क्रुझ टर्मिनलवर नाकारला प्रवेश..

"कोर्डेलिया" क्रुझ जहाजातील काही प्रवाशी कोविड पॉझिटिव्ह आढळल्याने जहाजाला मुरगाव बंदरात प्रवेश नाकारण्यात आला. सर्वांना सक्तीने चाचणी करायला लावली आहे.
cordelia cruise  denied entry to cruise terminal at MPT port

cordelia cruise denied entry to cruise terminal at MPT port

Dainik Gomantak

वास्को: मुंबईहून सुमारे दोन हजार पर्यटकांना घेऊन आलेल्या "कोर्डेलिया" क्रुझ (Cordelia Cruise) जहाजातील काही प्रवाशी कोविड पॉझिटिव्ह आढळल्याने जहाजाला मुरगाव बंदरात प्रवेश नाकारण्यात आला. सर्वांना सक्तीने चाचणी करायला लावली आहे.जो पर्यंत सर्व प्रवाशांची चाचणी होत नाही तोपर्यंत क्रुझ जहाजाला एमपीटी बंदरात क्रुझ टर्मिनलवर प्रवेश नाकारण्यात आला आहे.

<div class="paragraphs"><p>cordelia cruise  denied entry to cruise terminal at MPT port</p></div>
विश्व कोकणी केंद्राचे प्रवर्तक 'बस्ती वामन शणय' यांचे निधन

जे एम बक्क्षी यांच्या प्रयोजना खाली मुंबईहून गोव्यात आलेल्या " कोर्डेलिया" (cordelia cruise) या जहाजातील काही प्रवासी कोविड पॉझिटिव (Covid Positive) आढळल्याने या झाडाला आज मुरगाव बंदरात प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे प्रायोजकांची एकच धांदल उडाली. सदर जहाज मुरगाव बंदरापासून खोल समुद्रात नांगरून ठेवण्यात आले आहे. सदर पर्यटक जहाज मुंबईहून काल संध्याकाळी पर्यटकांना घेऊन गोव्यात निघाले. यात 1471 प्रवासी व 596 कर्मचारी वर्ग मिळून 2017 पर्यटक आहेत. दरम्यान सदर क्रूज जहाजावर काही प्रवासी कोविड पॉझिटिव आढळल्याने सरकारने सदर जहाजाला गोव्यात मुरगाव बंदरात प्रवेश देण्यास नाकारला असल्याने, सदर जहाज मुरगाव बंदरापासून खोल समुद्रात नांगरून ठेवण्याची पाळी प्रायोजक जे एम बक्क्षी यांच्यावर आली. जोपर्यंत जहाजा मधील सर्व प्रवाशांची चाचणी होत नाही, तोपर्यंत सदर जहाजाला मुरगाव बंदरात प्रवेश नाकारण्यात आला आहे. समुद्र पर्यटनाच्या मोसमाला 27 डिसेंबर 2021 पासून सुरू झाली होती. त्यानुसार सदर जहाजाने आपल्या पहिल्या फेरीत " कोर्डेलिया" हे प्रवासी जहाज 1500 प्रवासी व 600 क्रूज सह मुरगाव बंदरात दाखल झाले होते. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात सदर पर्यटक जहाजाच्या गोव्यात ऑक्टोबर महिन्यात 5 फेऱ्या, नोव्हेंबर महिन्यात 3 फेऱ्या तर डिसेंबर महिन्यात 2 फेऱ्या झाल्या. यात शेकडो देशी पर्यटकांनी गोव्यातील पर्यटनाचा लाभ उठविला. सप्टेंबर ते डिसेंबर पर्यंत सदर कोर्डेलियाच्या एकूण 10 फेऱ्या झाल्या. मध्यंतरी नोव्हेंबर महिन्यात सदर जहाज ड्रग्स सापडल्याने मुंबईत सदर जहाज कारवाईच्या विळख्यात सापडले होते. त्या वेळी सदर जहाज मुंबईहून गोव्यात येण्याच्या मार्गावर होते.

<div class="paragraphs"><p>cordelia cruise  denied entry to cruise terminal at MPT port</p></div>
मडगावात सक्रिय कोविड रुग्णांची संख्या गेली 211 वर..

दरम्यान जेएम बक्क्षीचे सरव्यवस्थापक गोविंद पेर्नूलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार काल संध्याकाळी सदर कोर्डेलिया जहाज मुंबईहून (Mumbai) गोव्यात यायला निघाले होते. यात या जहाजातील एका कर्मचाऱ्याला दोन दिवसा अगोदर ताप येत होता. सदर कर्मचारी मालवण येथील असून त्याच्या सर्व तपासण्या करण्यात आल्या. मात्र आज अचानक या जहाजावरील काही प्रवासी कोविड बाधित (Corona Case) आढळल्याची बातमी सर्वत्र पसरली. त्यानुसार एकच खळबळ माजली आहे. पण सत्य परिस्थिती तशी नसून सगळे प्रवासी सुखरूप आहेत. मात्र वाढत्या कोविड फैलावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केंद्राच्या मार्गदर्शक तत्वानुसार जहाजावरील सर्व पर्यटकांची आरटीपीसिआर चाचणी केली जाईल. त्याआधी सदर जहाज मुरगाव बंदरात नांगरण्यात येईल. या मुरगाव क्रूझ टर्मिनल वरील नांगरून ठेवलेली लहान-मोठी तटरक्षक दलाची जहाजे हलविण्यात येईल. त्यानंतर सदर जहाज मुरगाव बंदरात आणून जहाजातील पर्यटकांची आरटीपीसिआर चाचणी करण्यात येईल. सदर जहाजावरील पर्यटकांच्या अहवाल आल्यानंतरच जहाजातील पर्यटकांना मोकळीक देण्यात येईल असे पेर्नूलकर म्हणाले. त्यासाठी 10 तासांची वाट पाहावी लागेल असे त्यांनी सांगितले.

दरम्यान शेजारी राज्यामध्ये ओमायक्रोन रुग्णांची संख्या वाढत चालल्याने तसेच वाढत्या कोविड फैलावायच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केंद्राकडे मार्गदर्शक तत्त्वे अधिक कडक करण्याची मागणी केली आहे.राज्यात दरवर्षी भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढती राहिली आहे. याला अपवाद केवळ 2020 वर्षाचा आहे. गेल्या वर्षी मार्चपासून करोनामुळे लॉकडाऊन आणि विविध व्यवसायांवर बंधने होती. त्याचा सर्वच व्यवसायांना फटका बसला आणि अर्थव्यवस्थेवरही मोठा परिणाम दिसून आला. यातून पर्यटन व्यवसाय सुटला नाही. 2019 साली देशी आणि विदेशी मिळून 80 लाख 64 हजार 400 पर्यटकांनी राज्याला भेट दिली होती. त्या तुलनेत 2020 साली नोव्हेंबरपर्यंत केवळ 25 लाख 82 हजार 52 पर्यटकच राज्यात येऊ शकले.

जगभरात 27 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय पर्यटन दिवस म्हणून जाहीर झाला आहे. यानिमित्त राज्यात आणि देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. कॅसिनोमुळे लागू असलेला कर्फ्यू हटवण्यात आला. कॅसिनो, मसाज पार्लर यांसह विविध व्यवसाय काही बंधने ठेवून सुरू करण्यात आली होती. आता राज्यात पुन्हा हळूहळू पर्यटन बहरेल, अशी आशा निर्माण झाली होती.त्यानुसार पर्यटकांचा ओघ गोव्यात (Goa) वाढत गेला.

चालू 2022 वर्षात जानेवारी महिन्यात 5 फेऱ्या अपेक्षित आहे. फेब्रुवारी महिन्यात 3 फेऱ्या, मार्च 4 फेऱ्या, एप्रिल 5 फेऱ्या, मे 5 फेऱ्या. यानंतर जून ते सप्टेंबर सदर जहाज विश्रांती घेणार आहे. नंतर ऑक्टोबर महिन्यात 3 फेऱ्या, नोव्हेंबर-डिसेंबर पाच मिळून एकूण वर्ष 2022 मध्ये सदर कोर्डेलिया जहाजाच्या 34 फेऱ्या अपेक्षित असून यातून शेकडो पर्यटक गोव्यात दाखल होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com