कोरोना पॉझिटिव्‍ह पाच हजारवर; चोवीस तासांत ६३९ पॉझिटिव्‍ह

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 11 सप्टेंबर 2020

मागील चोवीस तासांत मृत्यू झालेल्यांत नुवे येथील ६५ वर्षीय पुरुष, वेर्णा येथील ५३ वर्षीय महिला, पेडणे येथील ६३ वर्षीय महिला, मेरशी येथील ४५ वर्षीय पुरुष, मडगाव येथील ४८ वर्षीय पुरुष आणि फोंडा येथील ६० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

पणजी: राज्यात आज दिवसभरात ६३९जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्‍यामुळे एकूण रुग्णांची संख्या ५ हजार ३० वर पोहोचली आहे. तसेच चोवीस तासांत ६ जणांचा बळी गेला. बळींची एकूण संख्या २६८ झाली आहे. 

राज्य आरोग्य सेवा संचालनालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आज दिवसभरात २ हजार ६६६ जणांची चाचणीसाठी स्वॅबचे नमुने घेण्यात आले. त्यात १ हजार ४४०जण निगेटिव्ह, तर ६३९ जण पॉझिटिव्ह आढळले. त्याशिवाय प्रकृती सुधारामुळे ४३६ जण घरी परतले आहेत. होम आयसोलेशनमध्ये ४४४ जण  उपचार घेत आहेत. त्याशिवाय ५ हजार ३० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

मागील चोवीस तासांत मृत्यू झालेल्यांत नुवे येथील ६५ वर्षीय पुरुष, वेर्णा येथील ५३ वर्षीय महिला, पेडणे येथील ६३ वर्षीय महिला, मेरशी येथील ४५ वर्षीय पुरुष, मडगाव येथील ४८ वर्षीय पुरुष आणि फोंडा येथील ६० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

श्रीपाद नाईक यांची प्रकृती स्थिर
दोनापावल येथील खासगी रुग्णालयात उपचार घेणारे केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. परंतु आवश्यकतेनुसार त्यांना साधा ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे. आणखी पाच ते सात दिवस त्यांना रुग्णालयात ठेवले जाईल, अशी माहिती त्यांचे पुत्र सिद्धेश नाईक यांनी दिली. 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या