गोव्यात कोरोना नियंत्रणात; एकाच दिवसात केवळ सहा बळी
coronaVIRUS 5.jpg

गोव्यात कोरोना नियंत्रणात; एकाच दिवसात केवळ सहा बळी

पणजी : शुक्रवारी राज्यात (Goa) केवळ सहा बळींची नोंद झाली. दोन महिन्यानंतर एका दिवसांतील हे सर्वात कमी बळी आहेत. त्यामुळे राज्यात कोरोना बऱ्यापैकी नियंत्रणात येत असल्याचे दिसून येते. गेल्या 26 दिवसांत 29,129 कोरोना बाधित बरे झाले. आतापर्यंत कोरोना मृत्यूंची संख्या ही 2,969 एवढी आहे. यात खासगी इस्पितळांनी (private hospitals) लपवलेल्या व बुधवारी उशिरा जाहीर केलेल्या तीन मृत्यूंचा समावेश आहे. 

गुरुवारी 2,956 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. त्यात 254 नवे कोरोना बाधित आढळून आले. दिवसभरात 468 कोरोना बाधित बरे झाले. राज्यात आतापर्यंत 3,824 सक्रिय कोरोना बाधित आहेत. गुरुवारी ज्या सहा जणांचा मृत्यू झाला ते सर्व 60 वर्षावरील आहेत. यातील चार गोमन्तकीय (Gomantakiya) व दोन महाराष्ट्रातील (Maharashtra) आहेत. राज्यातील कोरोना पॉजिटिव्हीटी (Corona positivity) दर 8 .60 टक्के झाला आहे. तर कोरोना बाधित बरे होण्याची टक्केवारी ही 95.85 वर पोचली आहे.

11 मे रोजी सर्वाधिक मृत्यू 
राज्यात एकाच दिवशी सर्वाधिक मृत्यू हे 11 मे रोजी नोंदवले गेले होते. ही संख्या 75 एवढी होती. त्यानंतर गुरुवारची 6 बळींची संख्या निच्चांकी ठरली.  दोन महिन्यांनी राज्यातील सक्रिय बाधितांची संख्या 4 हजाराखाली  आली आहे. 13 मे रोजी 32,953 एवढे सक्रिय रुग्ण होते.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com