गोव्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ७०७ वर

Corona death number rises to 707 in Goa
Corona death number rises to 707 in Goa

पणजी : राज्यात आज एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाला. यामुळे राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ७०७ वर आली आहे.

 
दरम्यान आज दिवसभरात ११२ लोकांना कोरोनाची लागण झाली तर १४७ लोक कोरोनोमुक्त झाले आहेत.सिंधुदुर्ग येथील ४२ वर्षीय महिलेचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची माहिती देण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील रिकव्हरी रेट ९६.४८ टक्के इतका आहे. राज्यभरात १०३० कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. आज ११२ लोकांनी होम आयसोलेशनचा मार्ग उपचारासाठी स्वीकारला तर इस्पितळात उपचार करण्यासाठी २६ लोकांना भरती करून घेण्यात आले.


१५२१ इतक्या कोरोना पडताळणी चाचण्या करण्यात आल्या. राज्यातील उत्तर गोव्यातील कोरोना केअर सेंटरची क्षमता २७५ खाटांची आहे यातील २६४ खाट सध्या रिकामे आहेत तर दक्षिण गोव्यातील कोरोना केअर सेंटरची क्षमता ६० असून यातील ४४ खाट रिकामे आहेत. सरकारकडे लोकांच्या उपचारासाठी पुरेशी जागा उपलब्ध असल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com