राज्यात मागील २४ तासांत कोरोनामुळे १२ रूग्णांचा मृत्यू

team dainik gomantak
बुधवार, 30 सप्टेंबर 2020

कोरोनामुळे गोव्यात १२ जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे राज्यातील बळींची संख्या आता ४१९ वर पोहोचली आहे.

पणजी-  मागील २४ तासांत कोरोनामुळे गोव्यात १२ जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे राज्यातील बळींची संख्या आता ४१९ वर पोहोचली आहे.

सोमवारी कोरोनामुळे अत्यवस्थ असलेल्यांपैकी 6 जण दगावले होते. मागील चोवीस तासांत दगावलेल्यांमध्ये ८ रूग्ण गोमेकॉमध्ये उपचार घेत होते. तर 2 रूग्ण ईएसआय रुग्णालयात उपचार घेत होते. एक अझिलो इस्पितळात,  तर एक रूग्ण वैद्यकीय सल्ला घेऊन इस्पितळातून डिस्चार्ज घेऊन घरी परतला होता. मात्र, घरी गेल्यावर त्याचा मृत्यू झाला आहे.

 गोव्यात कोरोना नियंत्रणात असताना टाळेबंदी उघडल्यावर अचानक रूग्णसंख्येत वाढ झाली. रूग्णसंख्येत झालेली ही वाढ चिंताजनक असून गोव्यात पुढील काळात अधिक गंभीर परिस्थिती ओढवण्याचा धोका निर्माण झाला आहे.       

संबंधित बातम्या