राज्यात मागील 24 तासांत 12 रूग्णांचा कोरोनाने मृत्यू

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2020

गुरूवारी नवीन 12 मृत्यूंची नोंद करण्यात आली. यात 9 पुरूष आणि 3 स्त्रियांचा समावेश आहे. राज्यातील एकूण  मृत्यू पावलेल्या रूग्णांची संख्या 441 झाली आहे. आज 524 नवीन रूग्णांची नोंद झाली असून उपचार घेत असलेल्या एकूण रूग्णांची संख्या 4976 इतकी झाली आहे.

पणजी-  गोव्यातील कोरोना रूग्णांच्या मृत्यूतील संख्येत वाढ झाली असून गुरूवारी नवीन 12 मृत्यूंची नोंद करण्यात आली. यात 9 पुरूष आणि 3 स्त्रियांचा समावेश आहे. राज्यातील एकूण  मृत्यू पावलेल्या रूग्णांची संख्या 441 झाली आहे. आज 524 नवीन रूग्णांची नोंद झाली असून उपचार घेत असलेल्या एकूण रूग्णांची संख्या 4976 इतकी झाली आहे. आज उपचारानंतर 400 रूग्णांना घरी देखील सोडण्यात आले.  
दरम्यान, देशात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असून तो आटोक्यात येत नसल्याचे दिसत आहे. गेल्या 2-3 आठवड्यांपासून देशात दररोज 80 ते 90 हजारांच्या दरम्यान रूग्णसंख्या वाढत आहे. मागील 24 तासांत देशात कोरोनाने 1 हजार 95 रूग्णांचा मृत्यू झाला असून 81 हजार 484 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आतापर्यंत देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 63 लाख 94 हजार 69 झाला आहे. तर कोरोनाने मृत झालेल्यांचा आकडा 99 हजार 773 झाला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 
दिलासादायक बाब म्हणजे देशात आतापर्यंत कोरोनाचे 53 लाख 52 हजार 78 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर सध्या 9 लाख 42 हजार 217 रुग्ण उपचार घेत आहेत. आता देशभरात ऑक्टोबर महिन्यात अनलॉक 5 सुरु केल्याने कोरोना रुग्ण वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
   

संबंधित बातम्या