फोंड्यातील वार्षीक जत्रेवर कोरोनाचे सावट

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 4 डिसेंबर 2020

कोविड निर्बंधामुळे फोंडा तालुक्यातील वार्षिक जत्रा उत्सवांला मंद असा प्रतिसाद मिळाला आहे. प्रेक्षकांच्या अनुपस्थितीमुळे खाजे, फुले विकणाऱ्या पारंपारिक विक्रेत्यांच्या व्यवसायाला चांगलाच धक्का बसला आहे. 

फोंडा: कोविड निर्बंधामुळे फोंडा तालुक्यातील वार्षिक जत्रा उत्सवांला मंद असा प्रतिसाद मिळाला आहे. प्रेक्षकांच्या अनुपस्थितीमुळे खाजे, फुले विकणाऱ्या पारंपारिक विक्रेत्यांच्या व्यवसायाला चांगलाच धक्का बसला आहे. 

बहुतेक मंदिरांनी काही स्टॉल्सना परवानगी दिली आहे, तर काहींनी त्यांच्या आवारात आपआपले स्टॉल उभारले आहे. जत्रामध्ये असणारे स्टॉल्स तसेच नाटक, करमणूकीचे कार्यक्रमही रद्द केले आहेत. 

फोंडा मध्ये मोठ्या संख्येने मंदिरे आहेत म्हणून कलाकारही जत्रामध्ये नेहमीच व्यावसायिक नाटकं आणि इतर कार्यक्रम करत असतात.  हे विक्रेते आणि कलाकार येथे आपला उदरनिर्वाह करतात. नोव्हेंबरमध्ये सुरू झालेल्या या जत्रेत कोरोना काळात यावेळी मंदिरांमध्ये येणारी गर्दी दिसली नाही. 

नवीन एसओपी नियमांचे पालन करत मंदिरे केवळ धार्मिक विधी करीत आहेत, ती देखील मर्यादित व्यक्तींच्या उपस्थितीने जत्रेसाठी देखिल काही मर्यादित नियमांच्या अटी घातल्या आहे.

एका मंदिरात तर जत्रेसाठी एकावेळी फक्त दोनशे लोकांनाच परवानगी देऊन जत्रेतील गर्दी नियंत्रित करण्याचा पर्यत्न केला आहे. आणि दहा वर्षापेक्षा कमी वयाची मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना हा उत्सव टाळण्याची विनंती सुध्दा केली आहे.

दरम्यान यापुढील पारंपारिक पालखी उत्सव, रथोत्सव आणि दिवाळी उत्सव देखिल मर्यादित प्रेक्षकांसह आणि कडक नियमांचे पालन करूनच आयोजित केले जातील. 

 

 

संबंधित बातम्या