न्यायालयीन महिला कर्मचाऱ्याला ‘कोरोना’ 

panaji court
panaji court

पणजी

राज्यात कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस प्रत्येक क्षेत्रात आढळून येऊ लागला आहे. पणजी येथील जिल्हा व सत्र न्यायालय इमारतीत कामाला असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. तिची कोविड - १९ चाचणी पोझिटिव्ह आल्याने न्यायालयातील कर्मचाऱ्यांमध्ये खबबळ उडाली. या इमारतीतील न्यायालयीन कामकाज आज ९ व उद्या १० जुलै असे दोन बंद ठेवण्यात आले आहे व सोमवारपासून (१३ जुलै) न्यायालयीन कामकाज पूर्ववत सुरू होईल. 
मिळालेल्या माहितीनुसार कुठ्ठाळ्ळी येथील महिला कर्मचारी पणजीतील न्यायालय इमारतीमध्ये कामाला आहे. गेल्या शनिवारी पणजीत ती कामाला आली होती. त्यानंतर कुठ्ठाळ्ळी येथे काही कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने तेथील काही लोकांची कोविड - १९ चाचणी करण्यात आली होती त्यामध्ये या महिला कर्मचाऱ्याचा समावेश होता. काल रात्री उशिरा तिची चाचणी पोझिटिव्ह आल्याने त्याची माहिती न्यायालय प्रशासनाला देण्यात आली. या महिलेसोबत न्यायालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या चाचण्या करण्यात आल्या असून त्याचा अहवाल प्रलंबित आहे. या न्यायालयाच्या इमारतीत अग्निशमन दलाच्या मदतीने पूर्णपणे निर्जंतुकीकरण करण्यात आले. या इमारतीतील न्यायालये उद्या बंद ठेवण्यात येणार असल्याने या न्यायालयासमोरील उद्याचे कामकाज असलेली प्रकरणे न्यायाधीश शबनम शेख यांच्याकडे वर्ग करण्यात आली आहेत तसेच या ई न्यायालयामधील प्रकरणे ईडीसी पाटो येथील स्पेसीस इमारतीमध्ये असलेल्या न्यायालयाचे न्यायाधीश घेतील अशी माहिती न्यायालयातील अधिकाऱ्यांनी दिली. 
बाल न्यायालय, लोकायुक्त या न्यायालये व निम्न न्यायिक अधिकारिणीला प्रत्यके दिवशी पाच प्रकरणांपेक्षा अधिक प्रकरणे सुनावणीस घेऊ नयेत तसेच सुनावणीवेळी संबंधित प्रकरणातील वकील अनुपस्थित राहिल्यास कोणताही आदेश दिला जाऊ नये. सामाजिक अंतर व नियमितपणे या इमारतीचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे असा आदेश कायदा व न्यायिक खात्याने काढला आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com