कोरोनाचे चोवीस तासांत चार बळी

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020

राज्यात आणखी चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला. ज्यामुळे राज्यात आजवर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ६६७ वर येऊन पोहचली आहे.

पणजी :राज्यात आणखी चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला. ज्यामुळे राज्यात आजवर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ६६७ वर येऊन पोहचली आहे. आज राज्यात १५४ जणांना कोरोनाची लागण झाली तर १९१ जण कोरोनमुक्त झाले आहेत. राज्यात १३८३ इतके कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत.

आज मृत्यू झालेल्या लोकांमध्ये महाराष्ट्रातील ठाणे येथील ५९ वर्षीय महिला, मडगाव येथील ६५ वर्षीय पुरुष, फातोर्डा येथील ८६ वर्षीय महिला आणि आके येथील ५५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. यातील दोन मृत्यू गोवा वैद्यकीय महाविद्यालयात,  १ मृत्यू इएसआय इस्पितळ मडगाव आणि एक हॉस्पिसिओ मडगाव येथे झाला आहे.

हॉस्पिसिओमध्ये ज्या रुग्णाचा मृत्यू त्याला इस्पितळात आणताना इपितळाच्या प्रवेशद्वारानजीक झाला. या रुग्णाची नंतर करण्यात आलेली चाचणी पॉझिटिव्ह आली. या रुग्णाला कोणत्याही प्रकारची कोरोनाची लक्षणे नव्हती, अशी माहिती रुग्णाच्या नातेवाईकांनी दिली.

संबंधित बातम्या