गोव्यात कोरोना संसर्ग प्रमाण नियंत्रणात

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 6 मार्च 2021

देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना संसर्ग रुग्णांचे प्रमाण वाढ आहेत व गोव्यातही त्याचे प्रमाण हळूहळू वाढण्याची चिन्हे दिसत असली, तरी हे प्रमाण नियंत्रणात आहे.

पणजी:  देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना संसर्ग रुग्णांचे प्रमाण वाढ आहेत व गोव्यातही त्याचे प्रमाण हळूहळू वाढण्याची चिन्हे दिसत असली, तरी हे प्रमाण नियंत्रणात आहे. आज दिवसभरात 79 नव्या कोरोना संसर्ग रुग्णंची नोंद झाली असून राज्यात सक्रिय असलेल्या कोविड रुग्णांची संख्या ६७५ वर पोहोचली आहे. कोरोनामुळे जुने गोवे येथील 43 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. गोव्यात वाढलेले हे प्रमाण पुन्हा कमी झाले आहे. आरोग्य संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार आज दिवसभरात एकाचा मृत्यू झाल्याने एकूण संख्या 799 झाली आहे.

राज्यातील विविध इस्पितळे तसेच आरोग्य केंद्रामध्ये १६०७ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली, त्यात 79 (4.9 टक्के) जण कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. गृह अलगीकरण व इस्पितळात उपचार घेत असलेले 42 रुग्ण बरे झाले आहेत. हे प्रमाण नव्याने नोंद झालेल्या कोरोना संसर्ग रुग्णांपेक्षा ५० टक्के आहे. गेल्या काही दिवसांत पाचशेपेक्षा कमी असलेली संसर्गाची संख्या सातशेच्या दिशेने वाटचाल करत आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.3 टक्के आहे. 25 पेक्षा अधिक कोरोना संसर्ग रुग्ण उपचार घेत असलेल्या म्हापसा शहर आरोग्य केंद्राच्या कक्षेत - 35, पणजी शहर आरोग्य केंद्र कक्षेत - 77, कांदोळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कक्षेत - 32, चिंबल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कक्षेत - 57, पर्वरी प्राथमिक आरोग्य केंद्र कक्षेत - 34, काणकोण सामुदायिक आरोग्य केंद्र कक्षेत - 36, मडगाव शहर आरोग्य केंद्र कक्षेत सर्वाधिक - 97, वास्को नगर आरोग्य केंद्र कक्षेत - 39, कासांवली प्राथमिक आरोग्य केंद्र कक्षेत - 29, कुठ्ठाळ्ली प्राथमिक आरोग्य केंद्र कक्षेत - 35, फोंडा प्राथमिक आरोग्य केंद्र कक्षेत 33 रुग्णांचा समावेश आहे.राज्यात कोरोना संसर्ग प्रमाण नियंत्रणातज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद राज्यात उत्तर व दक्षिण गोव्यात 114 पैकी 111 ठिकाणी कोरोना लसीकरणाचा पहिला व दुसरा डोस लोकांना देण्यात आला.

गोव्यात हवालाप्रकरणी ‘ईडीचे छापे 

उत्तर गोव्यात 1689 तर तर दक्षिण गोव्यात 5185 लस टोचणीचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. 356 आरोग्य कर्मचाऱ्यांना, 240 कोरोना योद्धे तर 60 वर्षांखालील व्याधीग्रस्त 338 जणांना तसेच 2448 ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणाचा पहिला डोस देण्यात आला. तसेच 901 आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरा लसीकरणाचा डोस देण्यात आला. दरम्यान, गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात आतापर्यंत 5001 लसीकरणाचे डोस देण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसात 840 जणांना कोरोना लसीकरणाचा डोस देण्यात आला असून तो विक्रम असल्याची माहिती गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी दिली.

गोवा पालिका निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतीम तारीख उद्या 

संबंधित बातम्या