धोक्याची घंटा! तरी गोवा सरकार सुस्त राज्यात कोरोना रुग्णांत दुप्पटीने वाढ

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 27 फेब्रुवारी 2021

गोव्यात कोरोना संसर्गाचा प्रभाव वाढू लागला असला तरी सरकार मात्र सुस्त आहे. आरोग्य संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार आज दिवसभरात म्हापसा येथील 89 वर्षे व मुरगाव येथील 81 वर्षे वयाच्या तसेच आगशी येथील 72 वर्षे वृद्धांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला.

पणजी : देशात अनेक राज्यांमध्ये कोरोना संसर्ग रुग्णांचे प्रमाण वाढ असताना गोव्यातही त्याचा फैलाव होत आहे. गेल्या काही दिवसांत हे प्रमाण वाढलेल्यांची लक्षणे दिसू लागली आहे. आज दिवसभरात 100 कोरोना संसर्ग रुग्णंची नोंद झाली असून कालच्यापेक्षा दुप्पटीने वाढली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्याही तीनवर पोहोचली आहे.

त्यामुळे गोव्यात कोरोना संसर्गाचा प्रभाव वाढू लागला असला तरी सरकार मात्र सुस्त आहे. आरोग्य संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार आज दिवसभरात म्हापसा येथील 89 वर्षे व मुरगाव येथील 81 वर्षे वयाच्या तसेच आगशी येथील 72 वर्षे वृद्धांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला. त्यामुळे ही संख्या 794 वर पोहचली आहे. या तिघा वृद्धांना काही दिवसांपूर्वी कोरोना रुग्ण म्हणून इस्पितळात दाखल करण्यात आले होते व त्यांच्यावर उपचार सुरू होते. एरव्ही गोव्यात गेला महिनाभर मृत्यूचे प्रमाण दोन संख्येवर गेले नव्हते तसेच संसर्गाचे प्रमाणही शंभरावर झाले नव्हते.

गोव्याच्या 13 वर्षीय मुलीवर जोखमीची स्पायनल स्कोलिओसिस शस्त्रक्रिया यशस्वी

या वाढलेल्या प्रमाणामुळे गोवा सरकारलाही इतर राज्यांप्रमाणे मार्गदर्शक सूचनांचा आदेश नव्याने काढण्याची गरज आहे. काही दिवसांपूर्वी आरोग्यमंत्र्यांनी राज्यात संसर्गाचे प्रमाण वाढल्यास नव्याने मार्गदर्शक सूचनांचा आदेश काढण्याची गरज व्यक्त केली होती. राज्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक अजूनही येत आहेत. त्यामुळे त्याचा धोका राज्यातील लोकांना होऊ शकतो. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नागरीकांना कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

गेल्या चोवीस तासांत 1813 जणांची चाचणी करण्यात आली. शुक्रवारी दिवसभरात राज्यातील विविध इस्पितळे तसेच आरोग्य केंद्रामध्ये 1813 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली, त्यात 100 (5.5 टक्के) जण कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. काल हे प्रमाण 50 होते. एका दिवसात ही संख्या दुप्पट झाली आहे. त्यामुळे हे प्रमाण असेच वाढत राहिल्यास राज्य पुन्हा संकटात येऊ शकते. गृह अलगीकरण व इस्पितळात उपचार घेत असलेले 41 रुग्ण बरे झाले आहेत. हे प्रमाण नव्याने नोंद झालेल्या कोरोना संसर्ग रुग्णांपेक्षा 50 टक्के आहे. गेल्या काही दिवसांत पाचशेपेक्षा कमी असलेली संसर्गाच्या संख्येने पुन्हा एकदा 500 पेक्षा अधिक संख्या गाठली आहे. राज्यात संध्या 587 कोरोना संसर्ग आहेत. 

गोव्याच्या पूर्वसीमेवर बेकायदेशीर दारू जप्त 

संबंधित बातम्या