गोव्यातील तालुक्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग; आतापर्यंत 4444 कोरोनाबाधित

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 1 मे 2021

सासष्टी गोव्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली असून राज्यात कोरोनामुळे मृत्यूसंख्यासुद्धा वाढत चालल्याने चिंताही वाढलेली आहे.

सासष्टी गोव्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली असून राज्यात कोरोनामुळे मृत्यूसंख्यासुद्धा वाढत चालल्याने चिंताही वाढलेली आहे. सासष्टी तालुक्यात गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 324 रुग्णांची भर पडलेली असून सासष्टी तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 4444 वर पोहचला आहे.  सासष्टी तालुक्यात मडगाव नागरी आरोग्य केंद्र, कासावली प्राथमिक आरोग्य केंद्र, नावेली प्राथमिक आरोग्य केंद्र, चिंचिणी प्राथमिक आरोग्य केंद्र, कुडतरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि लोटली प्राथमिक आरोग्य केंद्राचा समावेश आहे. मार्च महिन्याच्या सुरवातीला नोंदणी केलेल्या रुग्णांची संख्या 163 होती तर मार्च शेवटपर्यंत ही संख्या 352 पोचली होती. परंतु, एप्रिल महिन्याच्या सुरवातीपासून आकडेवारी पाहिल्यास कोरोना पॉझिटिव्ह झालेले अनेक रुग्ण समोर आले आहेत.(Corona infection in talukas of Goa So far 4444 coronated)

दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात भरती होणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालल्याने खाटांची संख्याही वाढविण्यात आलेली आहे. तरी, इस्पितळात बेड मिळणे कठीण बनलेले आहे. दक्षिण गोवा इस्पितळात उपचार घेणाऱ्या कोरोना बाधितांची संख्या आज 504वर पोचली असून इस्पितळात एकूण 9 रुग्ण कोरोनामुळे दगावल्याची नोंद झाली आहे. तर मडगाव इएसआय इस्पितळात भरती करण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 195 वर पोचली आहे. इएसआय इस्पितळात कॉविड रुग्णांना डायलिसिसची सुविधा देणेही सुरवात करण्यात आली असून सहा खाटा रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. उत्तर गोव्यातील वाळपईसारख्या तालुक्यातील कोविड रुग्णांनाही डायलिसिससाठी येथे येऊन उपचार घेण्याची मुभा देण्यात आली आहे.

बेळगाव, दावणगेरी आणि महाराष्ट्रातून आयात सुरूच, पण विक्रीत घट

पर्वरी परिसरात कडक बंद
गोवा सरकारने राज्यात वाढता कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी तीन दिवस लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्या पार्श्वभूमीवर पर्वरीतही आज कडकडीत बंद पाळण्यात आला.काही जीवनावश्यक वस्तूंची दुकाने खुली होती. म्हापसा-पणजी राष्ट्रीय महामार्ग  एरवी गजबजलेला असतो, पण आज या रस्त्यावरून एखादे दुसरे वाहन जाताना दिसत होते. गोवा बागायतदार या सुपर मार्केट मध्ये खरेदी करण्यास फार कमी ग्राहक दिसत होते. गेले काही दिवसापासून  समाज मध्यमावरून लॉकडाऊनसाठी सरकारची वाट न पाहता स्वयं लॉकडाऊन करून घ्या असे काही पर्वरीतील तरुण आवाहन करीत होते.त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत होता.त्यामुळे लोकांनी आपली सामाजिक जबाबदारी ओळखून स्वयं लॉकडाऊन करणे पसंद केले आहे. येथील सर्विस रोड ‘इव्हिनिंग वॉक’ घेण्यासाठी गजबजलेला असतो पण आज तो शांत दिसत होता. या संबंधी काही तरुणांना विचारले असता त्यांनी सांगितले कि हि महामारी आटोक्यात आणायची असेल तर रुग्णांची वाढती साखळी  तोडणे आवश्यक आहे. तसेच सामाजिक अंतर आणि मास्कचा योग्य वापर करणे हे आहे. पर्वरी पोलीसही गस्ती घालून लोकांना घोळका करून बसलेल्यांना हाकलना दिसत होते. प्रत्येक जण आपली सामाजिक जबाबदारी ओळखून  घरात बसलेला दिसत होता.

गोव्यातील सरकारी कार्यालये 15 मे पर्यंत निर्बंधात

म्हापसा  करोनाचा फैलाव वाढत आहे. बार्देश तालुका कोरोनाच्या संक्रमणात अडकून पडला आहे. बार्देश तालुक्यात आज 5774 संक्रीय कोरनाचे बाधिल आहेत. तसेच बार्देशमध्ये करोना मृत्यूने थैमान घातला आहे आज बार्देशमध्ये 4 मृत्यू नोंद आहे. म्हापसा मध्ये आज 123 करोनाचे रुग्ण बाधिल झाले त्या पाठपोठ कांदोळी 106 कोलवाळ 99 हळदोणा 73, पर्वरी 39 व शिवोली 30 असे आजच्या दिवशी करोनाची बाधिल रुग्ण आडकले आहे. सर्वात जास्त कांदोळी येथे 1600, पर्वरी 1431, म्हापसा 1141, शिवोली 707, हळदोणा 467, कोलवाळ 416 असे संक्रीय रुग्ण बाधिल असल्यामुळे बार्देश तालुक्यात 5774 संक्रीय रुग्णाची संख्या झाल्यामुळे बार्देश तालुका धोक्याची पातळी घाटत असल्यामुळे बार्देश मधील जनतेमध्ये हाहाकार माजला आहे. बार्देश तालुक्यात पर्यटकांची मोठी वर्दळ होती. शिवाय किनारी भागात चाललेल्या पर्यटन हंगामामुळेही या तालुक्यावर ताण आला. अनेकजण कोविडग्रस्त झाले. बसवाहतुकीतही शिस्त नाही, बसेस, बाजारात होणाऱ्या गर्दीमुळे कोविड रूग्ण वाढत आहेत.

Goa Lockdown: सांगे बाजारपेठ आजपासून बंद
काणकोणात नवे 80 रूग्ण
काणकोणात आज 80 कोरोनाग्रस्त सापडले. गेल्या मार्चपासून आजपर्यत काणकोणात 1439 नागरीकांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 977 करोना मुक्त झाले. तर 19 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. काणकोणातील ओव्हरे, नगर्से व श्रीस्थळ -गावडोंगरीत मिनी क्वॉरंटाईन झोन जाहीर करण्यात आले आहेत. आज सापडलेल्या रूग्णामध्ये पालिका क्षेत्रातील 38, श्रीस्थळ 8 खोला 10, लोलये 8, पैंगीण 11, गावडोंगरी  1 व आगोंद पंचायत क्षेत्रातील 4 रुग्णांचा समावेश आहे. काणकोणात कोरोनाग्रस्ताचा बुधवारी उच्चांक झाला होता. संध्याकाळी 5 वाजेपर्यत एन्टीजन तपासणीत 104 करोनाग्रस्त सापडले  होते. काणकोण पालिका क्षेत्रात लॉकडाऊनला  चांगला  प्रतिसाद  लाभला. पालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद होते. मासळी मार्केट पूर्णतः आज बंद राहिले. मात्र ग्रामीण भागात व्यवहार सूरू होते. मात्र नागरीकाची वर्दळ कमी राहिली. ठिकठिकाणी पोलिस वाहनाने गस्तीवर होते.

संबंधित बातम्या