पर्यटकांनाही कोरोनाची लागण!

Vilas Ohal
शनिवार, 25 जुलै 2020

राज्यात पर्यटन सुरू झाले, तरी पर्यटकांना ते कितपत भावले याविषयी आता प्रश्‍न उपस्थित होणार आहेत. कारण राज्यात पर्यटकांना कोरोना झाल्याची प्रकरणे आरोग्य खात्याकडे आली आहेत. परंतु, आरोग्य खात्याकडे किती पर्यटकांना कोरोना झाला आहे, याची पूर्ण माहिती नाही. परंतु काही प्रमाणात पर्यटकांना कोरोनाची प्रकरणे घडल्याची ग्वाही आरोग्य सचिव नीला मोहनन यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे राज्यात येणाऱ्या पर्यटकांना येथे आल्यानंतर कोरोना झाला असेल, तर ती पर्यटनाच्यादृष्टीने धोक्याची घंटा निश्‍चित मानली पाहिजे.

विलास ओहाळ

पणजी :

माहिती खात्याच्यावतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेस माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे सचिव संजय कुमार आणि संचालक मेघना शेटगावकर यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी मोहनन यांनी सांगितले की, राज्यभरात आज २१० रुग्ण बरे होऊन घरे परतले, तर १९० रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. राज्यात सध्या एकूण १ हजार ४४६ रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. तर आत्तापर्यंत २ हजार ८६५ रुग्ण बरे होऊन परतले आहेत. तर २९ जणांचे कोरोनाने बळी गेले आहेत. ‘कोविड’ संक्रमित असलेल्या रुग्णांशी आता संपर्क साधण्यासाठी आरोग्य सेतू ॲपचा वापर केला जात आहे.

‘कोविड’साठी हॉस्‍पिसियोत एक,
फोंड्यात दोन लॅब लवकरच
स्वॅबचे अहवाल येण्यास विलंब होत असल्याबाबत विचारलेल्या प्रश्‍नावर मोहनन म्हणाल्या की, सरासरी दिवसाला २६०० ते २७०० चाचण्या होत आहेत. आम्ही हॉस्पिसियो येथे आणखी एक आणि फोंडा लॅब येथे दोन यंत्रणा बसविणार असून, त्यामुळे दररोजच्या चाचण्यांमध्ये वाढ होईल. दोन्ही जिल्ह्यात दोन ‘कोविड’चे लक्षणे नसलेले असून, त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी घरीच आयसोलेशनमध्ये उपचार घेण्यास परवानगी दिली आहे. १५ ते २० जणांनी प्लाझ्मा दिला असून, लोक हे कार्य करण्यासाठी पुढे येत आहेत. त्याचबरोबर आणखी लोकांनी प्लाझ्मा देण्यास पुढे यावे, असे आवाहन त्‍यांनी केले. त्याचबरोबर शिक्षकांना कोरोना झाल्याने संघटनांनी घरूनच काम करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. त्याविषयी मोहनन म्हणाल्या की, याबाबत राज्य सरकार त्यावर चर्चा करून निर्णय घेईल.

नव्या ‘कोविड’
हॉस्पिटलची गरज नाही!
राज्यात सध्या ‘कोविड’ हॉस्पिटलमधील बेडचा वापर ५० टक्क्यांपेक्षा कमी राहिला आहे. त्यामुळे राज्यात ‘कोविड’ हॉस्पिटलची आवश्यकता नाही, असे विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना मोहनन यांनी सांगितले.
त्या म्हणाल्या की, सध्या आम्हाला ‘कोविड’ हॉस्पिटलची गरज खरोखर दिसत नाही. परंतु, भविष्यात आम्हाला ‘कोविड’ हॉस्पिटलची गरज भासल्यास आमची योजना तयार आहे. सध्या आम्ही असलेल्या हॉस्पिटलमधील संसाधनावर म्हणजेच आवश्‍यक सुविधांवर लक्ष केंद्रीत केल्याचे त्या म्हणाल्या. राज्यातील एका रुग्णालयाने आपल्याकडील आयसीयूमधील २० बेड देण्याचेही कळविल्याची माहिती त्यांनी दिली.

 - महेश तांडेल

संबंधित बातम्या