गोव्यात कोरोनाचा उद्रेक: राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय 

दैनिक गोमंतक
रविवार, 2 मे 2021

वाढते कोविड रूग्ण व मृतांच्या संख्यांमुळे राज्यासमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. खाटांची व्यवस्था, प्राणवायूची उपलब्धता, वैद्यकीय कर्मचारी यामुळे राज्यावर मोठे संकट ओढवले आहे.

पणजी : राज्यात कोरोना महामारीचा उद्रेक होत असताना आज तब्बल ५४ जणांचा कोविडमुळे बळी गेला. त्यामुळे वाढते कोविड रूग्ण व मृतांच्या संख्यांमुळे राज्यासमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. खाटांची व्यवस्था, प्राणवायूची उपलब्धता, वैद्यकीय कर्मचारी यामुळे राज्यावर मोठे संकट ओढवले आहे. गेले तीन दिवस सलगपणे तीन हजारावर नवे कोरोनाबाधित सापडत होते. परंतु ही संख्या २३०३ वर आली असून एकूण मृतांचा आकडा १२२२ झाला आहे. या परिस्थितीत लॉकडाऊन वाढविण्याबरोबरच कठोर निर्बंधांची मागणीही राज्यात जोर धरू लागली आहे. (Corona outbreak in Goa: State government takes big decision) 

गोवाः आप’चे ऑक्सिमित्र अभियान गतीने; लोकांना थेट घरपोच सेवा

सरकारचा आदेश
गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील शिक्षक व चौथ्या वर्षांतील विद्यार्थ्यांना आता इस्पितळांमध्ये नेमण्यात येणार आहे. राज्यांमधील इस्पितळांमध्ये मनुष्यबळाची कमतरता जाणवत असल्यामुळे  वैद्यकीय महाविद्यालयातील शिक्षक आणि चौथ्या वर्षांचे विद्यार्थी यांना विविध आरोग्य खात्याने आज  मृतांची संध्याकाळी जी यादी प्रसिद्ध केली होती, त्यात पहिल्यांदा ५४ बळी म्हटले होते. मात्र नंतर त्यामध्ये दुरुस्ती करून आजच्या दिवसांमध्ये ४० कोरोना बाधितांचे निधन झाल्याचे सांगून उर्वरित १४ व्यक्ती या २९ एप्रिल व ३० एप्रिल रोजी बळी गेल्याचे खुलासा करण्यात आला. मात्र यामुळे आरोग्य खात्यामध्ये चाललेला सावळागोंधळ चव्हाट्यावर आला असून विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी या सावळ्या गोंधळावर  व गोवा सरकारवर जोरदार टीका केलेली आहे. 

आतापर्यंत एका दिवसांमध्ये २६ एप्रिल रोजी ३८ कोरोना बळी गेले होते. मात्र आज ५४ बळी आणि तेही एका दिवसामध्ये गेले. त्यामुळे बळींचे आज अर्धशतक पूर्ण  झाले. हे एका दिवसातील आतापर्यंतचे सर्वाधिक बळी असून गोव्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. महत्त्वाचे म्हणजे राज्यांमध्ये परवापासून  चार दिवसाचा लॉकडाऊन लावण्यात आलेला आहे. काल ३०२४ व आज २३०३ कोविडबाधित होणे. आज ५४ बळी जाणे,  ही गोव्यात येत्या काही दिवसात कोरोनाचा हाहाकार माजण्यासंदर्भातील धोक्याची घंटा असून लॉकडाऊन कुचकामी ठरल्याचे दिसते, असे विरोधकांबरोबरच सर्वसामान्यांचेही मत आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी गोव्यात कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी अनेक उपाय योजत असल्याचे जाहीर केले असले तरी त्यांनी केलेले उपाय कामाला येत नसल्याचेही या एकंदर  परिस्थितीवरून स्पष्ट होताना दिसत आहे. त्यामुळे राज्यांमध्ये कोरोना स्थिती हाताबाहेर जातो की काय ? अशी स्थिती  सध्या निर्माण झालेली आहे. आज दिवसभरामध्ये ५८९७ जणांची कोविड तपासणी करण्यात आली. त्यामध्ये २४०३ नवे कोरोना संक्रमित व्यक्ती आढळले. आज गेल्या अनेक दिवसातील सर्वात जास्त असे  १३१० कोरोना बाधित बरे झाले आहेत.   राज्यात आजच्या दिवशी सक्रिय कोरोना बाधितांची संख्या २३ हजार ८८४ एवढी आहे.

लवकरच १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण 
१८ वर्षावरील व्यक्तींचे लसीकरण लस उपलब्ध न झाल्यामुळे सुरवात होऊ शकलेले नाही. सिरम इन्स्टिट्यूट, पुणे यांच्याकडे पाच लाख लसीचे डोस उपलब्ध करण्याची मागणी करण्यात आलेली असून त्यासाठी पैसेही भरण्यात आलेले आहेत. येत्या चार ते पाच दिवसांमध्ये ही लस गोव्यात उपलब्ध झाल्यानंतर १८ वर्षावरील नागरिकांसाठी नियोजनबद्ध गाव पातळीवर, तालुका पातळीवर लसीकरण सुरू करण्यात येईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले

४५ वर्षांवरील नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा
आज दिवसभरामध्ये  ४९९० लसीकरण झाले. त्यामध्ये ४  हजार ३६३  लोकांनी पहिला डोस तर ६२७ लोकांनी लसीचा दुसरा डोस घेतला. कोविशील्ड लस उपलब्ध झाली असून ५,३१,७२० लसीचे डोस उपलब्ध झाले. त्यातील आत्तापर्यंत ३ लाख ४६ हजार २४० लस पंचेचाळीस वर्षावरील लोकांना देण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये २ लाख ७२ हजार ४४३ पहिला डोस आणि ७३, ८०३ दुसरा डोस देण्यात आलेला आहे. त्यामुळे राज्याकडे अद्यापही १ लाख ८१  हजार ५३० एवढे लसीचा डोस उपलब्ध आहेत. राज्यातील ४५ वर्षावरील ज्या नागरिकांनी अद्यापही लस घेतलेली नाही. त्यांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आरोग्य खात्यातर्फे आवाहन करण्यात आले आहे.

खासगी इस्पितळात लस उपलब्ध; दर वाढला!
कोविड प्रतिबंधक लस उपलब्ध नसल्याने १८ ते ४५ वयोगटातील लसीकरण पुढे ढकलण्याची वेळ सरकारवर आली आहे, असे असताना खासगी इस्पितळांना मात्र लस उपलब्ध झाली असून १ हजार ३५० रुपये प्रती लस या दराने ती दिली जाणार आहे. खासगी इस्पितळांना चढ्या दराने लस देता यावी, यासाठीच सरकार आपल्या लसीकरण केंद्रात मोफत लस उपलब्ध करणे लांबणीवर टाकत असल्याचा आरोप होऊ लागला आहे. दोनापावल येथील मणिपाल इस्पितळाने लसीकरणाचे दर आज पत्रकातून जाहीर केले. त्यानुसार १८ ते ४५ वयोगटातील कोविन किंवा आरोग्य सेतूवर नोंद केलेल्यांनाच लसीकरण केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. एका लसीकरणासाठी १ हजार ३५० रुपये आकारले जाणार असल्याचे इस्पितळाच्या पत्रकात म्हटले आहे.

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी वेळेत लस उपलब्ध झाली नसल्यावरून सरकारवर टीका केली आहे. त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे, की असंवेदनशील, बेजबाबदार आणि कमकुवत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सिरम इन्सिस्ट्यूटकडे लसीची मागणी नोंदवण्यास उशीर केला. कोविडचे मृत्यू वाढत असताना जनतेला कोविड लसीचे कवच देण्यात सरकारला अपयश आल्याने मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. चोडणकर यांनी ही मागणी करतानाच आदर पुनावाला यांनी गोव्याला मदत करावी, असे आवाहनही केले आहे. खासगी इस्पितळातील लसीकरण दरावरून सरकारवर टीका होऊ लागली आहे. समाज माध्यमावर यासंदर्भात कडक शब्दांत सरकारला जाब विचारला जात आहे. खासगी इस्पितळांना चढ्या दराने लसीकरण करणे शक्य व्हावे, यासाठी सरकार लस आणणे लांबणीवर टाकतात, असा या टीकेचा सूर आहे.

कोरोनाबाधित महिलेने दिला बाळाला जन्म
कोरोना विषाणूची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा अधिक घातक बनलेली असून अशी परिस्थिती अनेकांना सुखद धक्का देणारी आनंदाची बातमी समोर आली आहे. मडगाव येथील मदर केअर इस्पितळात एका कोविड १९ पॉझिटिव्ह असलेल्या गर्भवती महिलेने बाळाला जन्म दिल्याची घटना घडली आहे. या महिलेची सिझेरियन पद्धतीने प्रसूती करण्यात आली आहे. पणजी येथे राहणाऱ्या कोविड १९ पॉझिटिव्ह असलेल्या गर्भवती महिलेला २८ एप्रिल रोजी मडगाव येथील मदर केअर इस्पितळात दाखल करण्यात आले. तिची प्रसूती करण्याचे आव्हान डॉक्टरांसमोर होते. हे आव्हान मदर केअर रुग्णालयाच्या स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ज्ञ रुग्णालयातील तरुण डॉक्टरांनी यशस्वीरीत्या पेलले. सर्व डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांनी सतर्कता बाळगून ही सिझेरियन प्रक्रिया केली. सुदैवाने सिझेरियन प्रसूतीमध्ये कुठलीही अडचण आली नाही. सध्या आई व बाळ सुखरूप असून दोघांनाही डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले.

डॉ. सावनी हेगडे सुर्लकर, डॉ. निरज बोरकर, डॉ. सुहेल नगर्सेकर, डॉ. केफास काद्रोज तसेच शस्त्रक्रिया विभागातील तिर्थंका नाईक, डॉ. प्रसाद हेगडे, डॉ. अमन प्रभूगावकर, डॉ. जागृती नाडकर्णी व मदर केअर इस्पितळातील सर्व कर्मचाऱ्यांचे विरोध पक्षनेते दिगंबर कामत यांनी अभिनंदन केले असून बाळ व आई दोघेही सुखरुप असल्याबद्दल स्वतःला आनंद झाल्याचेही त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या