कोरोना रुग्‍णसंख्‍या ५०७ वर

dainik gomantak
मंगळवार, 16 जून 2020

दरम्‍यान ५०७ रुग्‍णांमध्‍ये रस्‍ता, विमान आणि रेल्‍वेमार्गे आलेल्‍या ६८ रुग्‍णांचा समावेश आहे.

पणजी,

राज्‍यात कोरोनाबाधितांची संख्‍या वाढतच आहे. सोमवारी २८ रुग्‍ण पॉझिटिव्‍ह आढळले असून ११जणांच्‍या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. त्‍यामुळे राज्‍यात कोरोनाबाधितांची एकूण संख्‍या ५०७ झाली आहे. दरम्‍यान कोरोनाच्‍या पार्श्वभूमीवर जनमानसात भीती वाढतच असल्‍याचे चित्र गेल्‍या आठवड्यापासून आहे. तसेच ३१० जणांचे आरोग्‍य अहवाल प्रतीक्षेत आहेत, अशी माहिती आरोग्‍य खात्‍याने दिली.
सोमवारी ८६८ जणांच्‍या चाचण्‍यांसाठी नमुने गोळा केले होते. तर ८६३ जणांचे अहवाल आरोग्‍य खात्‍याचे हाती आले. विदेशातून आलेल्‍या १६२ प्रवाशांना घरी क्‍वारंटाईन केले आहे. तर २० देशी प्रवाशांना क्‍वारंटाईन केले आहे. इस्‍पितळातील आयसोलेशनमध्‍ये आज १० जणांना ठेवण्‍यात आल्‍याची माहिती आरोग्‍य खात्‍याने दिली. दरम्‍यान ५०७ रुग्‍णांमध्‍ये रस्‍ता, विमान आणि रेल्‍वेमार्गे आलेल्‍या ६८ रुग्‍णांचा समावेश आहे. मांगोरहिलमधील २७१, तर मांगोरहिलशी संबंधित १६० जण आहेत. नवेवाडे येथे १२ रुग्‍ण, मोर्ले येथे १७ रुग्‍ण, बायणा येथे २४ रुग्‍ण, चिंबल येथे १३ रूग्‍ण तर सडा येथे १७ रूग्‍ण असल्‍याची माहिती आरोग्‍य खात्‍याने दिली. मडगाव आणि बेती येथे दोघांचे अलगीकरण, तर केपे येथे चौघांचे अलगीकरण केले आहे.

 

संबंधित बातम्या