COVID-19 Goa: लसीच्या दोन डोसनंतरही कोरोनाग्रस्ताचा मृत्यू 

goa corona
goa corona

पणजी: गोव्यात आज दिवसभरात 44 कोरोनाग्रस्त (Coronavirus) रुग्णांचा मृत्यू झाला आहे, त्यामध्ये तीन रुग्णांनी पहिला लसीकरणाचा (Corona Vaccine) डोस घेतला होता तर एका रुग्णाने दोन्ही लसीकरणाचे डोस घेतले होते. आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार या 44 कोरोनाग्रस्त मृतांपैकी 22 जणांचा मृत्यू गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात, 12 जणांचा दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात, दोघांचा ईएसआय इस्पितळत, फोंडा उपजिल्हा इस्पितळात, चिखली उपजिल्हा इस्पितळात तसेच कुडतरी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे  तर पाच जणांचा मृत्यू खाजगी इस्पितळात झाला आहे. (Corona patient dies after two doses of vaccine)

आरोग्य खात्याने काल दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी 3 हजार 873 जणांची कोरोणा तपासणी करण्यात आली. काल जे अहवाल जाहीर झाले होते त्यानुसार आज 1,209 नवे कोरोना बाधीत सापडले .तर 2,160 कोरोना बाधित आज बरे झाले आहेत. गेल्या चोवीस तासांमध्ये 31 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत राज्यांमध्ये कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या 2,228 एवढी झालेली आहे . कालच्या दिवशीपर्यंत राज्यात सक्रिय कोरोना बाधितांची संख्या 22,964 एवढी असून गेल्या चोवीस तासांमध्ये 139 व्यक्तींना इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com