सासष्टीकरांनो सावधान! कोरोनाची रुग्णांची संख्या ठरतेय चिंता वाढवणारी

दैनिक गोमंतक
बुधवार, 14 एप्रिल 2021

सासष्टी तालुक्यातील आरोग्य केंद्रामध्ये एका दिवसांपूर्वी ८६० कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती, तर आज हा आकडा ९९९ वर पोहचला आहे.

सासष्टी: राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी वाढत चाललेली असून कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे नागरिकांची चिंताही वाढलेली आहे. सासष्टी तालुक्यातील आरोग्य केंद्रामध्ये एका दिवसांपूर्वी ८६० कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती, तर आज हा आकडा ९९९ वर पोहचला आहे. (Corona patients are on the rise in the world salcete)

सासष्टी (Salcete) तालुक्यात एका दिवसात १३९ नवे कोरोनाबाधित रुग्ण (Corona Patients) आढळून आले आहेत.   सासष्टी तालुक्यात मडगाव शहर आरोग्य केंद्र, कासावली प्राथमिक आरोग्य केंद्र, नावेली प्राथमिक आयोग्य केंद्र, चिंचिणी प्राथमिक आरोग्य केंद्र, कुडतरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि लोटली प्राथमिक आरोग्य केंद्राचा समावेश असून या सर्व आरोग्य केंद्र आतापर्यंत ९९९ कोरोनाबाधित रुग्णांची नोंदणी करण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटपर्यंत नोंदणी केलेल्या रुग्णांची संख्या १६१ होती, तर २३ मार्चपर्यंत ही संख्या २५८ होती. परंतु, एप्रिल महिन्यात कोरोना पॉझिटिव्ह झालेले अनेक रुग्ण समोर आले आहेत.    गोवा सरकारकडून जारी करण्यात येणाऱ्या अहवालानुसार मडगाव शहर आरोग्य केंद्रात १२ एप्रिलपर्यंत ४६६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंदणी करण्यात आली होती, आज आकडा ५२३ वर पोहचला आहे. कासावली आरोग्य केंद्रात १३० कोरोनाबाधित रुग्णांची नोंदणी करण्यात आली होती, तर आज हा आकडा १५५ वर पोहचला आहे. नावेली आरोग्य केंद्रात ६६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंदणी करण्यात आली होती आज तो आकडा ८७ वर पोहचला आहे. चिंचिणी प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची संख्या ६८ होती, आज ९२ वर पोहचली आहे. कुडतरी प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची संख्या ६६ होती, आज ७६ वर पोहचली आहे. लोटली प्राथमिक आरोग्य रुग्णांची संख्या ६४ होती, आज ६६ झाली आहे.स्वागत व प्रास्ताविक वल्लभ सामंत यांनी केले व ग्राहकांना अधिक चांगली सुविधा देणार असल्याची ग्वाही दिली. सूत्रसंचालन मेधा नाडकर्णी तर केशव गावडे यानी आभार मानले.

संबंधित बातम्या