सडा पठारावर ‘कोरोना’ रुग्ण आढळणे सुरूच

Baburao Revankar
मंगळवार, 11 ऑगस्ट 2020

मुरगाव मतदारसंघ क्षेत्रातील परीसरात कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढला आहे. मृत्यू संख्याही वाढू लागली आहे. ‘कोविड’चे बळी ठरलेल्या रुग्णांना पूर्वाश्रमीचे आजार होते. अनेकांना फुफ्फुसाचा आजार होता. श्‍वसनाचा त्रास होत होता, अस्थमाचा आजार होता. काहींना हृदयरोग, उच्च रक्तदाब, मधूमेह असे आजार होते. त्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती कमी झाली होती

मुरगाव, सडा, बोगदा, रुमडावाडा जेटी या सुमारे दोन किलोमीटर क्षेत्रातील सडा पठारावर कोविडमुळे दहा जणांना जीव गमवावा लागला असून, अद्यापही अनेक जण कोविड रुग्णालयात उपचार घेत आहेत. दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळण्याची मालिका सडा पठारावर सुरूच आहे.
मुरगाव मतदारसंघ क्षेत्रातील परीसरात कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढला आहे. मृत्यू संख्याही वाढू लागली आहे. ‘कोविड’चे बळी ठरलेल्या रुग्णांना पूर्वाश्रमीचे आजार होते. अनेकांना फुफ्फुसाचा आजार होता. श्‍वसनाचा त्रास होत होता, अस्थमाचा आजार होता. काहींना हृदयरोग, उच्च रक्तदाब, मधूमेह असे आजार होते. त्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती कमी झाली होती. म्हणून ते मृत्यूमुखी पडल्याचे आरोग्य खात्याकडून सांगितले जात आहे. दरम्यान, पूर्वाश्रमीचे आजार लोकांना जडण्यामागील कारण कोणते असावे, असा सवाल लोकांतून विचारला जात आहे. कोळसा प्रदूषण हेच कारण असावे, असा तर्क लोकांकडून व्यक्त केला जात आहे. गेल्या महिन्याभरात सडा पठारावरील दहा जण कोविडमुळे दगावले आहेत. मुरगाव बंदरातील कोळसा ढिगाऱ्यांपासून अर्धा ते एक किलो मीटर अंतरावरील रहिवासी होते.

सडा येथील ‘कोविड’
केंद्रात गैरसोयी..
.
सडा परीसरात एमपीटी इस्पितळ ‘कोविड’ केंद्र म्हणून कार्यरत करण्यात आले आहे. तेथे रुग्णांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या केंद्रात मुरगाव पालिकेचे नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांच्यासह चार नगरसेवक, पालिका मुख्य अभियंता व इतर कर्मचाऱ्यांची भरती झाली होती. त्यांना आलेल्या कटू अनुभवाविषयी नगरसेवकानी जाहीरपणे वाच्यता केली आहे. तरीही यात सुधारणा घडवून आणण्याच्या बाबतीत लक्ष दिले जात नाही. या प्रकरणी स्थानिक आमदार मिलिंद नाईक यांच्या कानावर गोष्टी घातलेल्या आहेत.

संबंधित बातम्या