गोव्यात मुबलक प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा असतांना कोरोना रुग्णांचा मृत्यू?

गोमंन्तक वृत्तसेवा
शनिवार, 24 एप्रिल 2021

राज्यात वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या मृत्यू व संसर्गामुळे सरकारी यंत्रणा सध्या गडबडून गेली आहे. आवश्‍यक प्रमाणात सरकारी इस्पितळांना प्राणवायूचा (ऑक्सिजन) पुरवठा न झाल्याने गेल्या काही दिवसांत मृत्यू झालेल्यांमधील काहींना मृत्यूला सामोरे जावे लागले,

पणजी : राज्यात वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या मृत्यू व संसर्गामुळे सरकारी यंत्रणा सध्या गडबडून गेली आहे. आवश्‍यक प्रमाणात सरकारी इस्पितळांना प्राणवायूचा (ऑक्सिजन) पुरवठा न झाल्याने गेल्या काही दिवसांत मृत्यू झालेल्यांमधील काहींना मृत्यूला सामोरे जावे लागले, अशी चर्चा आहे. राज्यात मुबलक प्रमाणात प्राणवायू असून अशी घटना घडली नसल्याचा दावा केला आहे.

गोव्यात संचारबंदीच्या नियमांचा उडाला फज्जा; हरमल भागात हॉटस्पॉट जाहीर 

राज्यात असलेल्या प्राणवायू पुरवठादारांनी सरकारी इस्पितळांऐवजी खासगी इस्पितळांना मोठ्या प्रमाणात पुरवठा केला. त्यामुळे काही इस्पितळांमध्ये रुग्णांना आवश्‍यक प्रमाणात प्राणवायू मिळणे अवघड झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. सरकारी इस्पितळांमध्ये मुबलक प्राणवायूचा पुरवठा असल्याचे आरोग्य खात्याकडून सांगितले जात असले, तरी अंतर्गत स्थिती ही वेगळी आहे. सरकारने काहीजणांना प्राणवायू पुरवठ्याचा अपवाद वगळता प्राणवायू उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना प्राणवायूच्या निर्यातीवर निर्बंध घातले आहेत. मात्र, काही प्राणवायू पुरवठादार सरकारी इस्पितळांना प्राणवायूचा पुरवठा करण्याऐवजी खासगी इस्पितळांना वेळेत तसेच पुरेसा पुरवठा करत आहे. प्राणवायूच्या तुटवड्यामुळेच सरकारला केंद्र सरकारकडे प्राणवायूसाठी विनंती करावी लागली आहे. तसेच कोल्हापूर येथून प्राणवायूचा साठा आणण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.

गोवा राज्यसरकारची मोठी घोषणा: राज्यातील नागरिकांना मिळणार फ्री कोरोना लस   

मिळालेल्या माहितीनुसार सरकारी इस्पितळातील कोविड रुग्णांव्यतिरिक्त इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या गंभीर रुग्णांनाही प्राणावायूची गरज आहे. त्यामुळे इस्पितळातील वॉर्डमध्ये असलेल्या रुग्णांच्या प्राणवायू कमी करून तो कोविड वॉर्डमध्ये असलेल्या रुग्णांसाठी वापरला जात आहे.

गोवेकरांनो रात्री बाहेर पडताय? थांबा, आधी हे वाचा, नाहीतर.. 

संबंधित बातम्या