कोरोना रुग्णांना इस्पितळांमध्ये जागा नसल्याने गृह अलगीकरणाची जबरदस्ती

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 31 ऑगस्ट 2020

दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातील सर्व भाग व मजले त्वरित पूर्णपणे कार्यान्वित करावेत. या इस्पितळातील सर्व आरोग्यसेवा लोकांना मिळणे ही आजची गरज आहे, असा इशारा विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी दिला.

पणजी: राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. सर्व कोविड इस्पितळांमध्ये रुग्णांना दाखल करून घेण्यास जागा नसल्याचे आरोग्यमंत्र्यांनी उघडपणे कबूल केले आहे. त्यामुळे भाजप सरकारने कोरोनाग्रस्त रुग्णांना गृह अलगीकरणासाठी जबरदस्ती करून प्रत्येक घराचे रुपांतर कंटेन्‍मेंटमध्ये केल्याची टीका विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली आहे. 

आता जनतेचे आरोग्य केवळ परमेश्‍वरानेच राखण्याची वेळ आल्याचे ते म्हणाले. दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातील सर्व भाग व मजले त्वरित पूर्णपणे कार्यान्वित करावेत. या इस्पितळातील सर्व आरोग्यसेवा लोकांना मिळणे ही आजची गरज आहे, असा इशारा कामत यांनी दिला.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या