महाराष्ट्राच्या धर्तीवर आता गोव्यात जाण्यासाठीही RT-PCR चाचणी बंधनकारक होण्याची शक्यता

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 25 फेब्रुवारी 2021

महाराष्ट्र व दिल्लीप्रमाणेच आता प्रवाशांना गोव्यात येण्यासाठीदेखील कोरोनाची RT-PCR चाचणी बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

पणजी :  महाराष्ट्र व दिल्लीप्रमाणेच आता प्रवाशांना गोव्यात येण्यासाठीदेखील कोरोनाची RT-PCR चाचणी बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असं गोवा वैद्यकिय महाविद्यालय व इस्पितळाचे प्रमुख आणि गोवा राज्य कोरोना रूग्णालायांचे प्रभारी डॉ. शिवानंद च्या बांदेकर यांनी सांगितलं. हे माझं वैयक्तिक मत असल्याचं ते म्हणाले. 

गोवा नगरपालिका प्रभाग आरक्षणावर निडणूक आयोगाने दिलं न्यायालयाला उत्तर

जेव्हा आपण मुबंई किंवा महाराष्ट्रातील इतर भागांत जातो, तेव्हा प्रवासाच्या 48 ते 72 तासांच्या आधी कोरोनाची RT-PCR चाचणी करणे बंधनकारक असते, याच धर्तीवर आपण हा निर्णय गोव्यातही लागू शकतो, असं ते म्हणाले. यामुळे गोव्यातील कोरोना संक्रमणाची भीती मोठ्या प्रमाणावर कमी होऊन, राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या कमी होण्यास मदत होणार असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. 

गोव्यात गेल्या 24 तासांत 57 नवे कोरोना रूग्ण; कर्नाटक, महाराष्ट्रामुळे चिंता वाढली

महाराष्ट्रातील पर्यटकांचा कायमच गोव्याकडे ओढा असतो. महाराष्ट्रातील कोरोनाची वाढती प्रकरणे बघता, गोव्याच्या नागरिकांनादेखील काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गोव्यामध्ये कोरोनामुळे झालेल्या मृतांच्या घटनेत सातत्याने घट झाली आहे. बांदेकर यांनी जनतेला आरोग्य मंत्रालयाच्या सर्व एसओपी आणि मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करण्यास सांगितले आणि प्रत्येकाचे लसीकरण होईपर्यंत काळजी घेण्याचे आवाहन केले. 
 

संबंधित बातम्या