गोव्यात कोरोनाचे दोन बळी; नव्या 112 रुग्णांची भर

राज्यात बुस्टर न घेणाऱ्यांचे प्रमाण अधिक
Covid-19
Covid-19Dainik Gomantak

कोरोना संसर्ग गोवा राज्याला पुन्हा विळखा घट्ट होत असल्याचं चित्र दिवसेंदिवस समोर येऊ लागले आहे. त्यामूळे वाढत चाललेला कोरोना फैलावाचा वेग आणि कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या याची तुलना करता सध्या कोरोना निर्बंध पाळणे आवश्यक बनले आहे. त्यामूळे राज्यातील नागरिकांनी सतर्क राहात नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. ( Corona spread in the state of Goa; Two victims today )

Covid-19
गोव्यात 'ओला'साठी सरकार सकारात्मक

कोरोना निर्बंध लसीकरणामुळे कोरोनाची लागण होऊनसुद्धा अधिकच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याची वेळ खूप अत्यल्प रुग्णांवर येत असतानाच आज कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य प्रशासनाने दिली आहे.

Covid-19
चोपडे-आगरवाडा येथे बंगला विक्रीच्या बहाण्याने सुमारे 5 कोटीची फसवणूक

राज्यात आतापर्यंत 2 लाख 48 हजार 41 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली असून, त्यापैकी 2 लाख 43 हजार 278 रुग्ण बरे झाले आहेत. आज 950 संशयितांच्या चाचण्या केल्या असता नव्याने 112 रुग्णांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत 3,835 रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत. यात आज दोन रुग्णांची भर पडली आहे. आज अखेर राज्यात 928 सक्रीय रुग्ण आहेत.

राज्यात बुस्टर न घेणाऱ्यांचे प्रमाण अधिक

कोरोना फैलावाबाबत बोलताना कृतिदल सदस्य उत्कर्ष बेतोडकर यांनी सांगितले की, राज्यात लसीकरणाचे प्रमाण मोठे आहे. असे असले तरी अद्याप बुस्टर न घेणाऱ्या नागरिकांचे प्रमाण अधिक आहे. 60 वर्षांवरील आणि अन्य आजारांनी त्रस्त असलेले नागरिक बुस्टर डोस घेण्यासाठी पात्र आहेत. त्यांनी तातडीने बुस्टर डोस घेणे गरजेचे आहे. सध्यातरी कोरोनासाठी लसीकरणाला पर्याय नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com