गोवा: गोमॅकोतील कर्मचारी रंगनाथ भोजे ठरले पहिले कोरोना लस लाभार्थी

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 16 जानेवारी 2021

 गोवा मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल (जीएमसीएच) (गोमॅको)  येथील कामगार रंगनाथ भोजे यांना सर्वप्रथम कोरोना लसीचा डोज मिळाला.

पणजी: समस्त देशाचे लक्ष लागलेल्या करोनावरील प्रत्यक्ष लसीकरणास आजपासून (शनिवार)सुरूवात झाली आहे. गोव्यातही लसीकरणास सुरवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वात मोठ्या लसिकरण मोहिमेचा शुभारंभ आज केला. खूप दिवसापासून कोरोना लसीची संपूर्ण भारवासीयांना प्रतिक्षा होती, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वात मोठ्या लसिकरण मोहिमेचा शुभारंभ केला. 

आज शनिवारी कोरोनाव्हायरसची लस देणाऱ्या हॉस्पिटलमधील कर्मचारी गोव्यातील पहिले कोरोना डोज घेणारे व्यक्ती ठरले, असे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. गोवा मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल (जीएमसीएच) (गोमॅको)  येथील कामगार रंगनाथ भोजे यांना सर्वप्रथम कोरोना लसीचा डोज मिळाला. असे एका अधिकाऱ्ंयाने सांगितले. जावडेकर व सावंत यांनी भोजे यांना लस दिल्यानंतर त्याचे गुलाब देऊन स्वागत केले.

राज्यातील दोन खासगी रुग्णालयांसह सात वेगवेगळ्या केंद्रांवर सकाळी लसीकरण मोहिमेस प्रारंभ झाला. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत जीएमसीएचमध्ये उपस्थित होते. शनिवारी या सुविधावर इतर लोकांनाही डोस मिळेल.

सकाळपासून अनेक आरोग्य कर्मचारी ही लस टोचून घेण्यास बाहेर उभे आहेत. दक्षिण गोव्यातील ज्येष्ठ डॉक्टर डॉ. इरा अल्मेडा यांनी माडगाच्या टीबी रुग्णालयात लस दिली.  गोव्यातील या   केंद्रांमधील डॉक्टरांचे पथक डोस घेत असलेल्या व्यक्तींच्या आरोग्याच्या स्थितीवर लक्ष ठेवणार असल्याचे ते म्हणाले.

जावडेकर म्हणाले, "ज्यांना लस दिली गेली आहे अशा कुटूंबाच्या सदस्यांना मी विनंती करतो की त्यांनी केंद्राच्या आत गर्दी करू नये. त्यांनी बाहेर उभे रहावे आणि व्यक्ती बाहेर येण्याची वाट पहावी," 

सावंत म्हणाले की, लसीकरण मोहिमेची सुरुवात राज्यातील सातही केंद्रांवर झाली असून पहिल्या दिवशी  ७००० लोकांना लस प्राप्त होणार आहे.
 

संबंधित बातम्या