राजधानीत कोरोनाचा उच्छाद

Vilas Ohal
बुधवार, 12 ऑगस्ट 2020

राजधानी पणजीत सध्या कोरोनाने उच्छाद मांडल्याचे दिसून येत आहे. आज दिवसभरात २७ जणांचे स्वॅबचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे हादरली आहे. त्यातच पणजीतील रुग्णांची संख्याही १२२ वर पोहोचली असल्याने ती चिंतेची बाब बनली आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या बळींची संख्या वाढत असल्याने कोरोनामुळे मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण कमी करण्यात आरोग्ययंत्रणा अपयशी ठरत असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. आज दिवसभरात सहाजणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला असल्याने ही बाब आता राज्याच्यादृष्टीने चिंतेची नक्कीच बनली आहे. तर दुसरीकडे ४१५ जणांच्या स्वॅबचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

विलास ओहाळ

पणजी :

राज्य सरकारने जाहीर केलेल्या बुलेटिनच्या आकडेवारीनुसार आज दिवसभरात सहा जणांनी जीव गमावला आहे. त्यात गोवा वेल्हा येथील ४५ वर्षीय, सडा-वास्को येथील ७२ वर्षीय, मेस्तावाडा-वास्को येथील ६८ वर्षीय, बायणा-वास्को येथील ६५ वर्षीय, बेती-रेईश मागूस येथील ६८ वर्षीय आणि सडा-वास्को येथील ७३ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. काल (सोमवारी) पाचजणांचे बळी गेल्यानंतर आज ही संख्या सहावर गेल्याने कोविड रुग्णालयातील उपचारांवर समाजमाध्यमांतून प्रश्‍न उपस्थित होऊ लागले आहेत. आज दिवसभरात २ हजार ३६ जणांच्या स्वॅबच्या चाचण्या घेतल्या, त्यातील ४१५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर ८६९ जणांचे अहवाल येणे बाकी आहेत. तसेच २७२ जणांचे आरोग्य सुधारल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
राजधानी पणजीत सध्या कोरोनाने उच्छाद मांडल्याचे दिसून येत आहे. आज दिवसभरात २७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने राजधानीत भीतीचे वातावरण पसरले आहेत. त्याशिवाय आज पॉझिटिव्ह आढळलेल्यांमध्ये आल्तिनो परिसरात नऊजणांचा समावेश असून, सातजण झोपडपट्टीतील आहेत. आज महापालिकेने आल्तिनो पॉलिटेक्निक महाविद्यालय व परिसर, टोंक-करंजाळे येथील इमारतींचे निर्जंतुकीकरण केले. दरम्यान, ग्रामीण भाग असलेल्या धारबांदोडा तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढणारी संख्याही चिंताजनक आहे. त्याठिकाणच्या रुग्णांच्या संख्येने आज शंभरी गाठली आहे. परंतु हॉटस्पॉट बनलेल्या वास्को, मडगाव आणि कुठ्ठाळी येथील आकडेवारी अजूनही भयदायी दिसून येत आहे. त्याचबरोबर उत्तर गोव्यात वाळपई व साखळी, म्हापसा व चिंबल ही ठिकाणे हॉटस्पॉट बनली आहेत.

शंभरापेक्षा जास्त रुग्णसंख्या
असणारी ठिकाणे

वास्को.......३७२
मडगाव.......२७९
कुठ्ठाळी ....२३३
फोंडा ........१६९
पणजी.........१२२
धारबांदोडा....१०४
चिंबल.........१५१
वाळपई........१०३
म्हापसा.........१०१

संपादन : महेश तांडेल

संबंधित बातम्या