गोवा राज्यातही कोरोना लसीकरणास सुरवात

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 16 जानेवारी 2021

गोवा राज्यात आज कोविड १९ लसीकरण मोहीम सुरू झाली. कोविड १९ लसीकरणासाठी राज्यात ७ केंद्रांची निवड करण्यात आली आहे.

पणजीः  समस्त देशाचे लक्ष लागलेल्या करोनावरील प्रत्यक्ष लसीकरणास आजपासून (शनिवार)सुरूवात झाली आहे. देशातील इतर राज्यातील कोरोना लसीकरणासोबतच गोव्यातही लसीकरणासाठी सुरवात झाली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वात मोठ्या लसिकरण मोहिमेचा शुभारंभ आज केला. खूप दिवसापासून कोरोना लसीची संपूर्ण भारवासीयांना प्रतिक्षा होती, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वात मोठ्या लसिकरण मोहिमेचा शुभारंभ केला. व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे त्यांनी आज सकाळी साडेदहा वाजता देशवासीयांशी, कोरोना योध्दयांशी संवाद साधला.

गोवा राज्यात आज कोविड १९ लसीकरण मोहीम सुरू झाली. कोविड १९ लसीकरणासाठी राज्यात ७ केंद्रांची निवड करण्यात आली आहे.  ७ केंद्रांवर एकूण ७०० जणांचं लसीकरण गोव्यात होणार आहे. यावेळी गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत उपस्थित होते.

संबंधित बातम्या