कोरोना रुग्णांसाठी राज्यात अत्याधुनिक दोन हजार खाटा उपलब्ध करून देणार:  विश्वजीत राणे

दैनिक गोमंतक
सोमवार, 26 एप्रिल 2021

राज्यातील कोरोना रुग्णांवर योग्य ते उपचार करून त्यांना लवकर बरे करण्यासाठी राज्यात येत्या काळात प्राणवायू (ऑॅक्सिजन) युक्त २ हजार खाटा उपलब्ध केल्या जाणार आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी आज दिली.

पणजी : राज्यातील कोरोना रुग्णांवर योग्य ते उपचार करून त्यांना लवकर बरे करण्यासाठी राज्यात येत्या काळात प्राणवायू (ऑॅक्सिजन) युक्त 2  हजार खाटा उपलब्ध केल्या जाणार आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे (vishwajit Rane) यांनी आज दिली. राज्यात कोरोना नियंत्रणात राहावा, यासाठी अनेक बैठकांचे आयोजन करून त्यातून योग्य नियोजन केले जात आहे. (Corona will provide 2,000 modern beds for patients in the state: Vishwajeet Rane) 

केपे पालिकेवर पुन्हा एकदा बाबू कवळेकरांचे वर्चस्व

सामुदायीक निर्णयातून कोरोना उपचारासाठी सोयीसुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. सध्या गोवा वैद्यकिय महाविद्यालय बांबोळी, दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ मडगाव, इएसआय इस्पितळ मडगाव, जिल्हा इस्पितळ म्हापसा, उपजिल्हा इस्पितळ फोंडा, कासावली इस्पितळ तसेच सडा येथील एमपीटीचे इस्पितळ कोरोना रुग्णावर उपचारासाठी वापरले जात आहे. या इस्पितळात सध्या 500  ते 600  प्राणवायुयुक्त खाटा उपलब्ध केल्या जात आहेत. येत्या काळात ही संख्या २ हजारावर नेण्यात येणार असल्याचे राणे यांनी सांगितले. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम, शिरोडा इस्पितळ येथे कोरोना उपचार केंद्रे सुरू झाली असून कमी लक्षणे असलेल्या रुग्णावर तेथे उपचार सुरू आहेत. गरज भासल्यास बांबोळी येथे बांधून तयार झालेले सुपर स्पेशालिटी इस्पितळही को रोना रुग्णांसाठी उपलब्ध केले जाणार आहे. उपचाराअभावी किंवा प्राणवायूअभावी एकाही कोरोना रुग्णाला जीव गमवावा लागू नये, यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न सुरू असल्याचे राणे यांनी सांगितले.

फातोर्डा फाॅरवर्डचे उमेदवार आघाडीवर; पहिल्या चार प्रभागातील चारही उमेदवार विजयी

लस घेण्यापूर्वी रक्त, प्लाझ्मादान करा
1  मे पासून राज्यातील 18  वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. लस घेतल्यानंतर 28  दिवस रक्तदान किंवा प्लाझ्मादान करता येत नाही. त्यामुळे जे लसीचा पहिला डोस घेणार आहेत, त्यांनी लस घेण्यापूर्वी रक्तदान करावे. तसेच जे कोरोनातून बरे झाले आहेत, त्यांनीही लस घेण्यापूर्वी प्लाझ्मादान करावा. कारण, 18  वर्षांवरील लोकांना लसीकरण सुरू झाल्यानंतर राज्यात रक्ताचा तुटवटा जाणवण्याची शक्यता आहे, असे गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी सांगितले.

संबंधित बातम्या