कोरोनाचा पाचवा बळी

Dainik Gomantak
शनिवार, 4 जुलै 2020

कुडतरीत ३१ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे कुडतरीतील दोन प्रभाग कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केले आहेत. कुडतरीतील बहुतांश कोरोना रुग्ण बरे झाले असून त्यांना त्यांच्या घरी विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. ‘त्‍या’ ज्‍येष्‍ठ महिलेला १८ जून रोजी कोविड इस्पितळात दाखल केले होते. गेल्या तीन दिवसांतील त्या कोरोनाच्या दुसरा बळी ठरल्या आहेत.

मडगाव, पणजी, :

कोरोनाची लागण झालेली कुडतरी येथील ७५ वर्षीय ज्येष्ठ महिलेचे शुक्रवारी कोविड इस्पितळात निधन झाले. ‘कोविड’च्या त्या गोव्यातील पाचव्या बळी ठरल्या आहेत. त्यांच्या अंत्यविधीची तयारी करण्यात आली असून त्यांच्यावर ४ जुलै रोजी कुडतरी चर्चच्या दफनभूमीत सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती कुडतरीचे आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी दिली.
कुडतरीत ३१ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे कुडतरीतील दोन प्रभाग कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केले आहेत. कुडतरीतील बहुतांश कोरोना रुग्ण बरे झाले असून त्यांना त्यांच्या घरी विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. ‘त्‍या’ ज्‍येष्‍ठ महिलेला १८ जून रोजी कोविड इस्पितळात दाखल केले होते. गेल्या तीन दिवसांतील त्या कोरोनाच्या दुसरा बळी ठरल्या आहेत. बुधवारी रात्री ताळगाव येथील ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला होता. सासष्टीत कोरोनाचा हा दुसरा बळी असून काही दिवसांपूर्वी चांद्रवाडा - फातोर्डा येथील ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला होता. ‘त्‍या’ महिलेच्‍या कुटुंबातील इतर सदस्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. तथापि, त्यांची प्रकृती सुधारली असून त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

कोरोना रुग्‍णसंख्‍या प्रतिदिन शंभरीकडे!
राज्यात आज कोरोनाचे ९४ रुग्ण आढळले. काल ९५ आढळले होते. आज ३८ रुग्ण बरे झाले. यामुळे एकंदरीत रुग्णसंख्या ८०० झाली आहे. गोमेकॉच्या अलगीकरण कक्षात अद्याप सात रुग्ण आहेत.
राज्यात आज आलेल्यांपैकी १२७ आंतरराष्ट्रीय प्रवासी तर १७४ आंतरराज्य प्रवासी गृह अलगीकरणात पाठवण्यात आले आहेत. संस्थात्मक अलगीकरणात ८ जणांना पाठवण्यात आले आहे. आज १ हजार ९५३ नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले. २ हजार ७०३ चाचण्यांचा निकाल सायंकाळी उपलब्ध झाला. राज्यात आजवर कोरोनाची लागण झालेली रुग्णसंख्या १ हजार ५७६ वर पोहोचली असून आजवर ७७२ जण बरे झाले आहेत, तर चार जणांना जीव गमवावा लागला आहे. आज ६१७ चाचण्यांचा निकाल येणे बाकी होते. राज्यात सध्या संस्थात्मक अलगीकरणात १०१ जण आहेत.
राज्यात असलेल्या ८०० रुग्णांचे वर्गीकरण, असे बाहेरून आलेले प्रवासी ११६, मांगोरहिल २४५, मांगोरहिलशी संबंधित २३८, कुडतरी १४, मडगाव १५, आंबेलीशी संबंधित २४, केपे १२, लोटली ८, इंदिरानगर चिंबल १४, नावेली २, गंगानगर म्हापसा १३, साखळी ४३, कामराभाट टोंक २, काणकोण ६, नास्नोळा १, पर्वरी ३, नवेवाडे वास्को १, कुंडई १, वेर्णा ५, फोंडा ८, वाळपई ५, माशेल ३, उसगाव २, साळ डिचोली ५, पेडणे २, सांगे १, पिर्ण १, म्हार्दोळ १, गोवा वेल्हा १, ताळगाव १, नुवे १, बेतकी १, आगशी १, करंझाळे १ आणि पिलार १. जास्त रुग्णसंख्या असलेले भाग असे सडा ६५, बायणा ६६, कुडतरी ३१, नवेवाडे ३९, चिंबल २७, झुआरीनगर ८४, मोर्ले २२, खारेवाडा ३० आणि बाळ्ळी २१.

संबंधित बातम्या