गोव्यात कोरोनाचा नवा स्ट्रेन?

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 2 एप्रिल 2021

नव्या प्रकारचा विषाणू गोव्यात पोहोचला आहे का याची खातरजमा करण्यासाठी काही नमुने पुण्याला पाठवणे गोवा सरकारच्या आरोग्य खात्याने सुरू केलेले आहे.

पणजी: गोव्यात कोरोनाचा नव्या प्रकारचा विषाणू आढळला आहे का याची तपासणी करण्यासाठी दर महिन्याला 15 नमुने पुणे येथील राष्ट्रीय विषाणूजन्य रोग निदान संस्थेकडे पाठवण्यात येत आहेत. जगभरात कोरोनाविषाणू चे विविध प्रकार आढळून लागल्यानंतर जागतिक पर्यटन नकाशावर वरचे स्थान असलेल्या गोव्यात हे विषाणू पोहोचतील अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. (Coronas new strain in Goa)

गोव्यात 45 वर्षांवरील ‘कोविड’ प्रतिबंधक लसीकरण सुरू

या पार्श्वभूमीवर नव्या प्रकारचा विषाणू गोव्यात पोहोचला आहे का याची खातरजमा करण्यासाठी काही नमुने पुण्याला पाठवणे गोवा सरकारच्या आरोग्य खात्याने सुरू केलेले आहे. याविषयी समन्वयक अधिकारी डॉ उत्कर्ष बेतोडकर यांनी सांगितले की गेल्या महिन्यात 15 नमुने पुणे येथे पाठवण्यात आले होते त्यातून नव्या प्रकारचा विषाणू अद्याप गोव्यात पोचलेला नाही असे सिद्ध झाले आहे. या महिन्यात आणखी 15 नमुने चाचणीसाठी पुण्यात पाठवण्यात येणार आहेत. आम्ही सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि संशयास्पद सर काही आढळले तर तो नमुना तात्काळ पुण्याला पाठवण्याची व्यवस्था आहे असे त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या