कोरोनाचा विसावा बळी

dead-body
dead-body

तेजश्री कुंभार

पणजी :

नवेवाडे येथील ५५ वर्षीय आणि झुआरीनगरातील ६७ वर्षीय महिलेचा गुरुवारी कोरोनामुळे बळी गेले. मुरगाव तालुक्यात आतापर्यंत १३ जणांचे बळी गेले, तर एकूण बळींची संख्‍या २० झाली आहे. दरम्यान, गुरुवारी १५७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली, तर १४३ रुग्णांच्‍या प्रकृतीत सुधारणा झाली. त्यामुळे सध्या राज्यात १२७२ कोरोनाबाधित असल्याची माहिती आरोग्य आरोग्य खात्याने दिली.
आजच्या दिवशी २३२० ज्यांच्या लाळेचे नमुने कोरोना पडताळणी चाचणीसाठी घेण्यात आले, तर २१५८ जणांचे अहवाल हाती आले असून ३६५४ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. एका आंतरराष्ट्रीय प्रवाशाला तर १० देशी प्रवाशांना क्वारंटाईन केले. १०८ लोकांना सुविधामय कक्षात ठेवण्यात आले. आयसोलेशनमध्ये ३३ जणांना ठेवण्यात आले आहे.
राज्यात असणाऱ्या एकूण रुग्णांमध्ये ट्रेन, रेल्वे आणि विमानमार्गे आलेले १२८ रुग्ण आहेत. मांगोरहिल येथील ६९ रुग्ण आणि मांगोरहिलशी संबंधित ३९८ रुग्ण आहेत. करंजळे येथे २ रुग्ण, गंगानगर म्हापसा येथे ७, खांडोळ्यात ३२, लोटलीत २६, मेरशीत ९, मंडूर येथे ११, नेरुल येथे २३, नुवेत ४, नावेलीत १०, पर्वरीत १०, फोंड्यात ४५, पणजीत ७, पेडणेत १७, पिलार येथे ३, केपेत २४, राय येथे ३, साखळीत ३४, उसगावात ८, गोवा वेल्हा येथे ४, करासवाडा येथे १६, मडगावात १७ रुग्ण आहेत.
आगशी, कांदोळी, पर्रा म्हापसा, थिवी, जुने गोवे, सांताक्रूझ, कुजिरा, कोलवाळ, चिखली, कुंभारजुवे, कोलवा, म्हार्दोळ, गिरी, कळंगुट, अंजुणा, हडफडे, येथे प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे.

सडा १००
बायणा १२५
कुडतरी ३८
नवेवाडे १०८
चिंबल १०४
झुआरीनगर १७०
खारेवाडा १०४
वेर्णा येथील कंपनी १३९

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com