काणकोणात कोरोनाच दुसरा बळी

Subhash Mahale
शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020

काणकोणात आज दुसरा कोरोना रुग्ण दगावला. पालिका क्षेत्रातील या रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याने ११ ऑगस्टला उपचारार्थ कोविड इस्पितळात दाखल करण्यात आले होते. त्याच्या बहिणीला पहिल्यांदा कोरोनाची लागण झाली होती. तिच्या संपर्कात आलेल्या त्याच्या नातेवाईकाची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये त्याच्या नातेवाईकांपैकी पाचजण कोरोनाग्रस्त आढळून आले

काणकोण

यापूर्वी पाळोळे येथील एका व्यक्तीचा मृत्यू कोरोनामुळे झाला होता. सध्या काणकोणात ३१ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत काणकोणमधील ७९ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली होती. आज काणकोणात कोरोनाची लागण झालेले दोन रुग्ण सापडले.
काणकोण तालुक्याच्या सातही पंचायत क्षेत्र तसेच पालिका क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण सापडू लागले आहेत. काणकोण आरोग्य केंद्रात रविवारपासून एन्टीजन तपासणी सुरू करण्यात आली आहे. सोमवारपर्यंत ३४ नागरिकांच्या या किटद्वारे तपासणी करण्यात आली आहे. या एन्टीजन तपासणी किटद्वारे अर्ध्या तासात तपासणी अहवाल प्राप्त होत असतो. काणकोण सामाजिक आरोग्य केंद्राला एक हजार किटचा पुरवठा करण्यात आला असल्याचे आरोग्याधिकारी डॉ. वंदना देसाई यांनी सांगितले.

संपादन - यशवंत पाटील

संबंधित बातम्या