कोविड- १९ गोवा: चोवीस तासात कोरोनाचे दहा बळी

प्रतिनिधी
रविवार, 13 सप्टेंबर 2020

७४० नवे रुग्ण, ५११ बरे झाले

पणजी: राज्यात कोविडमुळे गेल्या चोवीस तासात आणखीन १० जणांनी आपले प्राण गमावले. यामुळे कोविडमुळे मरण पावलेल्यांची संख्या २८६ वर पोचली आहे. राज्यभरात कोविडमुळे गेल्या २४ तासात दहा जणांचा मृत्यू झालेला आहे गेल्या २४ तासात ७४० जणांना कोविडची लागण झालेली आहे तर ५११ बरे झालेले आहेत आज २७६ जणांना गृह अलगीकरणाची सुविधा देण्यात आली. सरकारने आज २ हजार ९६३ नमुने चाचणीसाठी पाठवले होते, त्यातून आज ७४० जणांना कोविडची लागण झाल्याची माहिती देण्यात आली आहे. चाचणीनंतर आज १ हजार ८१२ जणांना कोविडची लागण झाली नसल्याची माहिती देण्यात आली आहे. ४११ नमुन्यांचा अहवाल येणे बाकी आहे. राज्यात आजवर २४ हजार १८५ जणांना कोविडची लागण झाली तर त्यातून १८ हजार ५७४ जण बरे झाले आहेत, राज्यात आता ५ हजार ३२३ कोविडचे रुग्ण आहेत.

संबंधित बातम्या