राज्यात कोरोना बळींचा टप्‍पा ४०० पार

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 28 सप्टेंबर 2020

आरोग्य सेवा संचालनालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आज दिवसभरात १ हजार ४२८ जणांचे नमुने तपासणीसाठी घेतले. त्यात ३८४ जण पॉझिटिव्ह आढळले, ३०३ जणांना घरगुती विलगीकरणात परवानगी मिळाली.

पणजी: राज्याने आज कोरोनाच्या ४०० बळींची संख्या (४०१) पार केली. मागील चोवीस तासांत दहा बळी गेले. शनिवारी बळींची संख्या ३९१ होती. दरम्यान, २४ तासांत ७०१ जण घरी परतले. 

आरोग्य सेवा संचालनालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आज दिवसभरात १ हजार ४२८ जणांचे नमुने तपासणीसाठी घेतले. त्यात ३८४ जण पॉझिटिव्ह आढळले, ३०३ जणांना घरगुती विलगीकरणात परवानगी मिळाली. २९१ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. २४ तासांत ७०१ जणांना प्रकृती सुधारल्याने घरी सोडण्यात आले. राज्यभरात सक्रिय पॉझिटिव्ह रुग्ण ५ हजार ९७ एवढे आहेत. 

मागील २४ तासांत मृत झालेल्या दहा जणांमध्ये दोनापावल येथील ६९ वर्षीय महिला, डिचोली येथील ७३ वर्षीय महिला, ६३ वर्षीय पुरुष, नावेली - सासष्टी येथील ७३ वर्षीय पुरुष, भोम -फोंडा येथील ६५ वर्षीय महिला, टोंका- पणजी येथील ६१ वर्षीय पुरुष, मांद्रे येथील ६५ वर्षीय महिला, फातोर्डा येथील ८९ वर्षीय पुरुष, मडगाव येथील ५८ वर्षीय पुरुष आणि वास्को येथील ५३ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या