राज्‍यात चोवीस तासांत ४५६ पॉझिटिव्‍ह तर सहा बळी

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 28 ऑगस्ट 2020

राज्यात असणाऱ्या सक्रिय कोरोना रुग्णांचा आकडा सध्या ३४४५ इतका आहे. आजच्या दिवशी २५२७ जणांच्या लाळेचे नमुने कोरोना पडताळणी चाचणीसाठी घेण्यात आले. यातील ४२१ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. 

पणजी: राज्‍यातील आणखी सहा कोरोनाबाधितांचा बळी गेला. यामुळे मृतांची एकूण संख्‍या १७१ वर पोहोचली आहे. तसेच मागील चोवीस तासांत ४५६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, तर ३५६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यात असणाऱ्या सक्रिय कोरोना रुग्णांचा आकडा सध्या ३४४५ इतका आहे. आजच्या दिवशी २५२७ जणांच्या लाळेचे नमुने कोरोना पडताळणी चाचणीसाठी घेण्यात आले. यातील ४२१ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. 

आज सहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला त्‍यामध्‍ये ताळगाव येथील ५८ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. त्‍याचा मृत्‍यू गोमेकॉत झाला. मडगाव येथील ९५ वर्षीय पुरुष, मडगाव येथील ६९ वर्षीय पुरुष, बांबोळी येथील ८४ वर्षीय महिला, पारोडा येथील ६५ वर्षीय महिला, मडगाव येथील ५४ वर्षीय पुरुष यांचा मृत्यू मडगाव येथील ईएसआय इस्‍पितळात झाला आहे. 

दरम्यान एकूण कोरोना पॉझिटिव्ह रेल्‍वे, विमान आणि रस्तामार्गे आलेले ९ रुग्ण आहेत. डिचोलीत ३३ रुग्ण, साखळीत १०८, पेडणेत ९४, वाळपईत ८६, म्हापशात १६३, पणजीत १६८, बेतकी येथे ७१, कांदोळीत ६०, कोलवाळ येथे ९८, खोर्लीत ११३, चिंबल येथे ११७, पर्वरीत १७७, कुडचडेत १०५, काणकोणात ६२, मडगावात ४९६, वास्कोत २६७, लोटली येथे ५५, मेरशी येथे ४६, केपेत ९४, शिरोड्यात ५६, धारबांदोडा येथे ३४, फोंड्यात २५८ आणि नावेली आरोग्य केंद्रात ११७ रुग्ण आणि इतर ठिकाणीही रुग्ण आढळल्‍याची माहिती आरोग्य खात्याने दिली.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या