राज्यात दिवसभरात ५०८ कोरोनाबाधित तर ८ जणांचा मृत्यू

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 5 सप्टेंबर 2020

राज्य आरोग्य संचालनालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आज वरील संख्येप्रमाणे स्वॅबची चाचणी घेतली, त्यातील १ हजार ६३१ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर ३८४ जणांचा अहवाल येणे बाकी आहे.

पणजी: राज्यात दिवसभरात घेतलेल्या २ हजार ५२३ स्वॅब चाचण्यांपैकी ५०८ जण पॉझिटिव्ह आढळले, तर दिवसभरात ३८६ जणांच्‍या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. मागील चोवीस तासांत ८ जणांचा बळी गेला. त्यामुळे राज्यातील आत्तापर्यंत बळींची संख्या २२० वर पोहोचली आहे. 

राज्य आरोग्य संचालनालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आज वरील संख्येप्रमाणे स्वॅबची चाचणी घेतली, त्यातील १ हजार ६३१ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर ३८४ जणांचा अहवाल येणे बाकी आहे. याशिवाय २७० जणांची होम आयसोलेशनमध्ये जाणाऱ्यांची भर पडली असून, आत्तापर्यंतची ही संख्या ६ हजार ७०४ वर पोहोचली आहे. 

ज्यांचा मृत्यू झाला आहे, त्यामध्ये दवर्ली येथील ५४ व ६० वर्षीय महिला, रायबंदर येथील ७८ वर्षीय पुरूष, बाणावली येथील ७३ वर्षीय महिला, हळदोणा येथील ७६ वर्षीय महिला, वास्को येथील ७५ वर्षीय पुरुष, बेतकी येथील ६५ वर्षीय महिला आणि ४८ वर्षीय अनोळखी पुरुष यांचा समावेश आहे. 

राज्यात सध्या फोंडा, वास्को, मडगाव पाठोपाठ पर्वरी आणि साखळी येथील वाढणारी रुग्णांची संख्या चिंतेची बाब बनली आहे. राज्यात सध्या ४ हजार ८९६ जण कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. याशिवाय पणजीतही आज दिवसभरात २६ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या