राज्यात कोरोनाचे थैमान सुरूच; चौवीस तासात ६१३ पॉझिटिव्ह तर ११ जणांचा बळी

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

राज्य आरोग्य सेवा संचालनालयाने आज जाहीर झालेल्यांच्या संख्येनुसार आज १ हजार ९०० जणांची चाचणी करण्यात आली. त्यात ६१३ जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. तर ४३४ जण घरगुती अलगीकरण होऊन उपचार घेत आहेत.

पणजी: राज्यात मागील २४ तासांत कोरोनाचे  ११ बळी गेल्याने आत्तापर्यंतची बळींची संख्या ३१५ वर पोहोचली आहे. सोमवारी १४ बळी गेले होते. त्यामुळे लागोपाठ दोन दिवस दहाच्यावर बळी गेले आहेत. 

राज्य आरोग्य सेवा संचालनालयाने आज जाहीर झालेल्यांच्या संख्येनुसार आज १ हजार ९०० जणांची चाचणी करण्यात आली. त्यात ६१३ जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. तर ४३४ जण घरगुती अलगीकरण होऊन उपचार घेत आहेत. त्यामुळे असा उपचार घेणाऱ्यांची संख्या १० हजार २९७ एवढी झाली आहे. तसेच १७९ जण रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत. ६७४ जणांचे अहवाल येणे बाकी असल्याचे दिसून येते. 

२७ वर्षीय युवतीचा मृत्यू
मागील २४ तासांत जे बळी गेले आहेत त्यात डिचोली येथील २७ वर्षीय युवतीचा मृत्यू झाला आहे. मडगाव येथील ६८ वर्षीय पुरुष, पारोडा -सासष्टी येथील ८३ वर्षीय पुरुष, वास्को येथील ८२ वर्षीय पुरुष केपे येथील ८२ वर्षीय महिला, बागा कळंगुट येथील ३४ वर्षीय युवक, सांताक्रूझ येथील ५२ वर्षीय पुरुष, दाबोळी येथील ५५ वर्षीय महिला, खोर्ली- म्हापसा येथील ९० वर्षीय पुरुष, पर्वरी येथील ७९ वर्षीय पुरुष आणि आमोणा - डिचोली येथील ७२ वर्षीय महिलेचा मृतांमध्ये समावेश आहे.

सोपटे खासगी रुग्णालयात
आमदार दयानंद सोपटे यांना आज दोनापावल येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. काल आमदार टोनी फर्नांडिस यांनाही त्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या