दोघांचा मृत्यू शेवटच्या दहा मिनिटांत! सातजण दगावले: मृतांची संख्या ३८३ वर

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020

आज दिवसभरात २ हजार १११ जणांचे नमुने चाचणीसाठी घेण्यात आले. त्यात ६७३ जण पॉझिटिव्ह आढळले. ४२७ जणांना घरगुती विलगीकरणात राहण्यास अनुमती मिळाली आहे.

पणजी: कोरोनामुळे मागील चोवीस तासांत ७ जणांनी जगाचा निरोप घेतला. परंतु, यातील दोघेजण रुग्णालयात दाखल होऊन केवळ १० मिनिटांत दगावले. राज्य आरोग्य सेवा संचालनालयाच्या माहितीवरून हे स्पष्ट झाले आहे. चोवीस तासांत सात बळी गेल्याने राज्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ३८३ वर पोहोचली आहे. 

आज दिवसभरात २ हजार १११ जणांचे नमुने चाचणीसाठी घेण्यात आले. त्यात ६७३ जण पॉझिटिव्ह आढळले. ४२७ जणांना घरगुती विलगीकरणात राहण्यास अनुमती मिळाली आहे. २४६ जणांना रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले आहे. त्याचबरोबर ४९० जणांची प्रकृती सुधारल्याने ते घरी गेले आहेत. राज्यात एकूण अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांची संख्या ५ हजार ८२२ एवढी झाली आहे.

सात मृतांमध्ये वास्को येथील ५३ वर्षीय पुरुष, ताळगाव येथील ५७ वर्षीय महिला, वास्को येथील ७९ वर्षीय पुरुष, कारापूर तिस्क येथील ७६ वर्षीय पुरुष, फातोर्डा येथील ७० वर्षीय पुरुष, कुडतरी येथील ४० वर्षीय महिला आणि शिवोली येथील ८३ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

आज गुरुवारी एकाच दिवसात मये विभागात ८, डिचोली विभागात ७ आणि साखळी विभागात १८ मिळून तालुक्‍यात ३३ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या