राज्यात ७३६जणांच्या प्रकृतीत सुधारणा; चोवीस तासांत आठ जणांचा मृत्‍यू

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

राज्य आरोग्य सेवा संचालनालयाने आज जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार १ हजार ८६३ जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यात ५९० पॉझिटिव्ह आढळले, २९० जणांना घरगुती विलगीकरणात उपचार घेण्यास मंजुरी मिळाली. २३९ जण रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल झाले. 

पणजी: राज्यात आज दिवसभरात ७३६ रुग्ण प्रकृती सुधारल्याने ते घरी परतले, तर ५९०जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. मागील चोवीस तासांत ८ जणांचा बळी गेला.  त्‍यामुळे एकूण मृतांची संख्या ३६८ वर गेली. 

राज्य आरोग्य सेवा संचालनालयाने आज जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार १ हजार ८६३ जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यात ५९० पॉझिटिव्ह आढळले, २९० जणांना घरगुती विलगीकरणात उपचार घेण्यास मंजुरी मिळाली. २३९ जण रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल झाले. 

राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ५ हजार ५१३ वर गेली आहे. मागील चोवीस तासांतील मृतांमध्ये सांतिनेज पणजी येथील ६९ वर्षीय महिला, वास्को येथील ६९ वर्षीय पुरुष, चांदोर - सासष्टी येथील ६० वर्षीय पुरुष,  सांतइस्तेव-तिसवाडी येथील ८३ वर्षीय महिला, कणकवली येथील ३२ वर्षीय युवक, सांतिनेज येथील ५९  वर्षीय महिला, वाळपई येथील ८७ वर्षीय पुरुष, मांगोरहिल -वास्को येथील ७९ वर्षीय महिलेचा समावेश आहे.

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या