राज्‍यात कोरोना बळींची संख्‍या पावणेचारशेवर; चोवीस तासांत ८ जणांचा बळी

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

घरगुती अलगीकरण करून उपचार घेणाऱ्या ४०२ जणांना मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे अशा स्वरूपाचे उपचार घेणाऱ्यांची एकूण संख्या १३ हजार १८४ वर पोहोचली आहे.

पणजी: राज्‍यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहेत. मागील चोवीस तासांत कोरोनाने ८ जणांचा बळी घेतला. त्यामुळे मृतांची एकूण संख्‍या ३७६ वर पोहोचली आहे. आज दिवसभरात १ हजार ८७२ जणांचे नमुने घेण्यात आले. त्यात ५३६ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. घरगुती अलगीकरण करून उपचार घेणाऱ्या ४०२ जणांना मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे अशा स्वरूपाचे उपचार घेणाऱ्यांची एकूण संख्या १३ हजार १८४ वर पोहोचली आहे. त्याशिवाय २४७ जणांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले आहे.

दिवसभरात ३९५ जण प्रकृती सुधारामुळे घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ७९.८४ वर गेली आहे. त्याचबरोबर ८ जण दगावल्याने एकूण बळींची संख्या ३७६ झाली आहे. बुधवारी मृत्‍यू झालेल्‍यापैकी ५ जण गोमेकॉमध्ये, ३ जण ईएसआय रुग्णालयातील आहेत. मृतांमध्ये जुने गोवे येथील ७५ वर्षीय महिला, हळदोणा येथील ७७ वर्षीय पुरुष, चोडण येथील ७४ वर्षीय पुरुष, फोंडा येथील ४९ वर्षीय पुरुष, वास्को येथील ८१ वर्षीय पुरुष, वास्को येथील ७६ वर्षीय महिला, आके - सासष्टी येथील ५० वर्षीय पुरुष आणि मलभाट-मडगाव येथील ५५ वर्षीय महिलेचा समावेश आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या