गोव्यात कोरोनाचे आणखी आठ बळी; ४९७ पॉझिटिव्‍ह

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 27 ऑगस्ट 2020

आजच्या दिवशी ४९७ लोकांचे कोविड पॉझिटिव्ह अहवाल आले आणि २८७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यात ३३५२ इतके सक्रिय कोरोनाबाधित आहेत. 

पणजी: राज्यात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. बुधवारी आठ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली. यामुळे आजवर मृत्यू झालेल्‍या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १६५ वर पोहोचली आहे. तर  आजच्या दिवशी ४९७ लोकांचे कोविड पॉझिटिव्ह अहवाल आले आणि २८७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यात ३३५२ इतके सक्रिय कोरोनाबाधित आहेत. 

मृत कोविड पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पेडे म्हापसा येथील ६४ वर्षीय महिला, फातोर्डा येथील ५२ वर्षीय पुरुष, सावर्डे येथील ६० वर्षीय आणि ७२ वर्षीय पुरुष, आर्ले येथील ४३ वर्षीय पुरुष, चिखली येथील ७१ वर्षीय पुरुष, वास्को येथील ६३ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. यातील चार जणांचा मृत्यू बांबोळी येथील गोवा वैद्यकीय इस्पितळात झाला आहे. 

आज ज्या कोविड पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला, त्यांच्यामध्ये बेती येथील ७७ वर्षीय पुरुष, आके, मडगाव येथील ६४ वर्षीय पुरुष आणि एका ७१ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. दरम्यान हे तिन्ही रुग्ण कोविड पॉझिटिव्ह असले तरी त्यांच्या आरोग्याची स्थिती अत्‍यंत नाजूक होती, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.

२४११ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हॉस्पिटल आयसोलेशनमध्ये ९८ जणांना ठेवण्यात आले. २२६८ जणांच्‍या लाळेचे नमुने घेण्यात आले, तर २४११ जणांचे अहवाल हाती आले आहेत. रेल्‍वे,  विमान आणि रस्तामार्गे आलेले ९ रुग्ण आहेत. डिचोलीत ३६ रुग्ण, साखळीत ९४, पेडणेत ९६, वाळपईत ९७, म्हापशात १४६, पणजीत १६३, बेतकी येथे ७५, कांदोळीत ६०, कोलवाळ येथे ६०, खोर्लीत ११४, चिंबल येथे १२१, पर्वरीत १७२, कुडचडेत ९७, काणकोणात ४६, मडगावात ४९७, वास्कोत २५८, लोटलीत ५०, मेरशीत ४८, केपेत ९३.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या