राज्यात कोरोनाचे सर्वाधिक १४ बळी; चोवीस तासांत ३०६ पॉझिटिव्‍ह

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 15 सप्टेंबर 2020

आरोग्य सेवा संचालनालयाने दिलेल्‍या माहितीनुसार आज १ हजार ९३ जणांच्या स्वॅब चाचणीसाठी घेण्यात आले. त्यात ३०६ जण पॉझिटिव्ह आढळले असून, एकूण अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ४ हजार ९४६ वर गेली आहे. ३३८ जणांना आज घरगुती अलगीकरणात ठेवले आहे.

पणजी: कोरोनामुळे मागील २४ तासांत १४ बळी गेल्याने एकूण मृतांची संख्या ३०४ वर पोहोचली आहे. दिवसभरात ३०६ जण पॉझिटिव्ह आढळले असून, ५१९ जणांची प्रकृती सुधारल्याने घरी सोडण्यात आले.  

आरोग्य सेवा संचालनालयाने दिलेल्‍या माहितीनुसार आज १ हजार ९३ जणांच्या स्वॅब चाचणीसाठी घेण्यात आले. त्यात ३०६ जण पॉझिटिव्ह आढळले असून, एकूण अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ४ हजार ९४६ वर गेली आहे. ३३८ जणांना आज घरगुती अलगीकरणात ठेवले आहे.

सोमवारी मृत्‍यू झालेल्‍यांत साखळी येथील ६८ वर्षीय महिला, नावेली येथील ६४ वर्षीय महिला, वास्को येथील ५४ वर्षीय महिला, बेती येथील ७२ वर्षीय, सांगोल्डा येथील ३८ वर्षीय, वास्को येथील ९४ वर्षीय, गिरी येथील ७२ वर्षीय, केरी-पेडणे येथील ६१वर्षीय, जुने गोवे येथील ६५ वर्षीय, सांताक्रूझ येथील ६५ वर्षीय, डिचोली येथील ७१ वर्षीय, सासष्टी येथील ४५ वर्षीय, सावर्डे येथील ६६ वर्षीय पुरुष आणि पारोडा येथील २६ वर्षीय युवकाचा समावेश आहे.

आमदार टोनी रुग्णालयात, सोपटे अलगीकरणात
राज्यातील राजकीय व्यक्तींना कोरोनाची लागण होण्याचे सत्र काही थांबण्याची लक्षणे दिसत नाहीत. सोमवारी आणखी दोन आमदारांना कोरोनाचा संसर्ग झाला. आमदार आंतोनियो (टोनी) फर्नांडिस यांना खासगी रुग्णालयात, तर आमदार दयानंद सोपटे यांना घरगुती अलगीकरण करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी सांताक्रूझचे आमदार फर्नांडिस यांना अस्वस्थ वाटल्याने त्यांना दोनापावल येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्‍यांची तपासणी केल्‍यानंतर त्यांना कोरोनाची संसर्ग झाल्‍याचे निदर्शनास आले. तर मांद्रेचे आमदार तथा पर्यटन विकास महामंडळाचे चेअरमन दयानंद सोपटे हे कोरोना संसर्गामुळे घरगुती अलगीकरणात उपचार घेत आहेत. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या