४३७ कोरोना पॉझिटिव्ह रुंगणांच्या प्रकृतीत सुधारणा तर ४ जणांचा मृत्यू

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 25 ऑगस्ट 2020

गोमेकॉतील १४५, १४६ आणि १४७ हे वॉर्ड आता गंभीर रुग्णांच्या उपचारासाठी वापरण्यात येतील,अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी ट्विटरवर दिली.

पणजी: सोमवारी आणखी चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्‍याची  माहिती आरोग्य खात्याने दिली. तसेच मागील चोवीस तासांत १३९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्‍ण नव्‍याने सापडले, तर ४३७ जणांच्‍या प्रकृतीत सुधारणा झाली. त्‍यामुळे राज्यात ३०८१ एवढे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली. राज्यात आजवर १४८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. 

सोमवारी मृत्यू झालेल्‍यांत ५० वर्षीय मडगाव येथील पुरुषाचा समावेश आहे. त्‍यांचा मृत्यू दक्षिण गोव्यातील जिल्हा इस्पितळात झाला. ईएसआय रुग्णालयात दाखल केलेल्‍या वास्को ६७ वर्षीय पुरुष रुग्‍णाचा मृत्यू गोमेकॉत झाला. तसेच फातोर्डा येथील ५५ वर्षीय पुरुष रुग्ण आणि बाळ्ळी येथील ५० वर्षीय पुरुष रुग्‍णाचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली.  दरम्यान, रेल्‍वे, विमान आणि रस्तामार्गे आलेले ९ रुग्ण आहेत. डिचोलीत ४, साखळीत ६५, पेडणेत ९०, वाळपईत ६२, म्हापशात १३४, पणजीत १७२, बेतकी येथे ५८, कांदोळीत ७६, कोलवाळ येथे ९०, खोर्लीत ११०, चिंबल येथे १४६, पर्वरीत १६३, कुडचडेत ८४, काणकोणात ४५, मडगावात ५०२, वास्कोत २५०, लोटलीत ६१, मेरशीत ४५ रुग्‍ण आहेत.

गोमेकॉतील तीन वॉर्ड गंभीर रुग्णांसाठी
गोमेकॉतील १४५, १४६ आणि १४७ हे वॉर्ड आता गंभीर रुग्णांच्या उपचारासाठी वापरण्यात येतील,अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी ट्विटरवर दिली. जनतेच्या कल्याणासाठी आम्ही तत्पर आहोत. आमची टीम कोविड निर्मूलनासाठी व लोकांना दर्जेदार आरोग्‍यसेवा देण्‍यासाठी दिवसरात्र झटत आहे, असेही ते म्‍हणाले.

 

 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या