चोवीस तासांत ३९२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; बळींचा दीडशेचा टप्‍पा पार

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 26 ऑगस्ट 2020

मागील चोवीस तासांत ३९२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर ३१५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्‍यामुळे राज्यात सक्रिय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३१४९ एवढी झाली आहे.

पणजी: राज्यात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. मंगळवारी ९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला. त्‍यामुळे  कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण १५७ इतके झाले आहे. मागील चोवीस तासांत ३९२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर ३१५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्‍यामुळे राज्यात सक्रिय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३१४९ एवढी झाली आहे. चाचण्यांमधील ४४६ चाचण्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. 

आज मृत्यू झालेल्‍यांत धारबांदोडा येथील ५२ वर्षीय पुरुष, वास्को मांगोरहिल येथील ४९ वर्षीय महिला, पेडणेतील ५२ वर्षीय पुरुष, ७० वर्षीय पेडणे येथील पुरुष, मेरशी येथील ७३ वर्षीय पुरुष, बोरी येथील ७३ वर्षीय पुरुष, चांदोर येथील ६४ वर्षीय पुरुष, मडगाव येथील ५० वर्षीय पुरुष आणि मडगाव येथील ७२ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली. आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार आजच्या दिवशी हॉस्पिटल आयसोलेशनमध्ये ९३ जणांना ठेवण्यात आले, तर हॉस्पिटल आयसोलेशनमध्ये १८८ जण आहेत. २४६३ जणांच्‍या लाळेचे नमुने घेण्यात आले, तर २३११ जणांचे अहवाल हाती आले. रेल्‍वे, विमान आणि रस्तामार्गे आलेले ९ रुग्ण आहेत. डिचोलीत १५ रुग्ण, साखळीत ७९, पेडणेत ८१, वाळपईत ९०, म्हापशात १४५, पणजीत १६२.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या