राज्यात कोरोनाचे थैमान सुरूच; २४ तासात ४५३ पॉझिटिव्ह

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 24 ऑगस्ट 2020

राज्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या १४४ झाली. आज ४५३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून २७६ रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत. राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णांचा आकडा सध्या ३३८३ इतका आहे. आजच्या दिवसातील १८६ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत

पणजी: राज्यात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार गेल्या दोन दिवसात म्हणजेच २२ आणि २३ ऑगस्ट रोजी मिळून ९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. २२ ऑगस्ट रोजी ५ तर २३ ऑगस्ट रोजी ४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  

राज्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या १४४ झाली. आज ४५३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून २७६ रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत. राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णांचा आकडा सध्या ३३८३ इतका आहे. आजच्या दिवसातील १८६ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत. 

काल म्हणजेच २२ ऑगस्ट रोजी ज्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे मृत्यू झाले, त्यांच्यामध्ये फातोर्डा येथील ७१ वर्षीय पुरुषाचा समावेश असून मृत्यूपश्चात शवविच्छेदनात ही व्यक्ती पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. 

गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झालेले आके येथील ६५ वर्षीय पुरुष, बेतालभाटी येथील ८५ वर्षीय पुरुष, मडगाव येथील ३० वर्षीय पुरुष, पेडणे येथील ७८ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. 

आज म्हणजेच २३ ऑगस्ट रोजी ज्या पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला, त्यांच्यामध्ये गोवा वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू पावलेल्या ६६ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. फोंडा येथील ४२ वर्षीय महिला, शिवोली येथील ५१ वर्षीय पुरुष तर मडगाव येथील ७५ वर्षीय पुरुषाचा समावेश असल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली. 

२३ ऑगस्ट रोजी आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आजच्या दिवशी हॉस्पिटल आयसोलेशनमध्ये ८३ जणांना ठेवण्यात आले. ८८० जनांच्या लाळेचे नमुने घेण्यात आले तर १०३५ जणांचे अहवाल हाती आहेत.

२२ रोजीची आकडेवारी
२२ रोजी ३०४ इतके कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते आणि या दिवशी ४७९ इतके रुग्ण कोरोनामुक्त झाले. २२ रोजी राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ३६३१ इतकी होती.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या