डिचोलीत कोरोनामुळे वृद्ध महिलेचा मृत्यू;  रुग्णसंख्येत घट

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

आज रविवारी तालुक्यात २९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्यातील साखळी विभागात सर्वाधिक २७ रुग्ण, तर डिचोली विभागात एकही रुग्ण आला नाही. मये विभागात केवळ दोनच कोरोनाबाधित आढळले आहेत, अशी माहिती मामलेदार कार्यालयातून उपलब्ध झाली आहे. 

डिचोली: डिचोलीत कोरोना महामारीचे थैमान चालूच असून आज रविवारी एका महिलेचा कोरोनामुळे बळी गेला.  उपचारार्थ बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केलेल्या आजाराने त्रस्त साखळी परिसरातील ८८ वर्षीय ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला आहे. आरोग्य खात्याच्या बुलेटिनवरून ही माहिती मिळाली आहे. 

एका वृद्ध महिलेचा बळी गेला असला, तरी रविवारी मात्र डिचोली तालुक्यात कोरोना रुग्ण संख्येत घट झाल्याचे आकडेवारीवरून समजते.  आज रविवारी तालुक्यात २९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्यातील साखळी विभागात सर्वाधिक २७ रुग्ण, तर डिचोली विभागात एकही रुग्ण आला नाही. मये विभागात केवळ दोनच कोरोनाबाधित आढळले आहेत, अशी माहिती मामलेदार कार्यालयातून उपलब्ध झाली आहे. 

रविवारी डिचोली विभागात १९१,  मये विभागात १८६ आणि साखळी विभागात १२८ मिळून तालुक्यात एकूण ५०५ कोरोनाचे सक्रिय रुग्ण असल्याची माहिती मिळाली आहे. आज डिचोलीत ३३, मयेत २२ आणि साखळीत १८ मिळून तालुक्यात ७३ रुग्ण बरे झाल्याची माहिती मिळाली आहे. तालुक्यातील ८४ रुग्ण कोविड सुविधा केंद्रात उपचार घेत आहेत, तर ४१४ रुग्णाना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहेत. सात  रुग्णांवर कोविड रुग्णालयात उपचार चालू आहेत, अशी माहिती डिचोलीच्या मामलेदार कार्यालयातून मिळाली आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या