राज्यात कोरोनामुळे १९२ जणांचा मृत्यू

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 1 सप्टेंबर 2020

सोमवारी ४१४ रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले, तर ३९१ रुग्ण कोरोनामुक्त झाले. सध्या ३६४९ इतकी कोरोना रुग्णांची संख्या असल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली. 

पणजी: राज्यात आज नऊ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे राज्यात आजवर झालेल्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या मृत्यूची संख्या आता १९२ एवढी झाली आहे. सोमवारी ४१४ रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले, तर ३९१ रुग्ण कोरोनामुक्त झाले. सध्या ३६४९ इतकी कोरोना रुग्णांची संख्या असल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली. 

कोविडपासून जनतेला वाचविण्यासाठी आम्ही तत्पर आहोत, असे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी सांगितले. आज मृत्यू झालेल्‍यात मडगावातील ६५ वर्षीय पुरुष, सांतिनेझ येथील ६९ वर्षीय पुरुष, रायबंदर येथील ८५ वर्षीय पुरुष, फोंड्यातील ५३ वर्षीय पुरुष, सांतिनेज येथील ७१ वर्षीय पुरुष, मेरशीतील ५१ वर्षीय पुरुष, सावर्डेतील ६८ वर्षीय महिला व एका व्यक्तीचा समावेश आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या