रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्‍यासाठी ‘आयुर्वेदिक काढा’

तुकाराम सावंत
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

जगभर दहशत माजवलेल्या कोरोना महामारीची प्रत्येकाने धास्ती घेतली आहे. कोरोना महामारीवर गुणकारी औषध आले नसल्याने, या जीवघेण्या महामारीचा संसर्ग टाळण्यासाठी सध्या  प्रत्येकजण आवश्‍यक ती खबरदारी घेत आहे. काढा आदी गावठी औषधोचार करण्यावर प्रत्येकजणांचा आटापिटा चालू आहे. 

डिचोली: जगभर दहशत माजवलेल्या कोरोना महामारीची प्रत्येकाने धास्ती घेतली आहे. कोरोना महामारीवर गुणकारी औषध आले नसल्याने, या जीवघेण्या महामारीचा संसर्ग टाळण्यासाठी सध्या  प्रत्येकजण आवश्‍यक ती खबरदारी घेत आहे. काढा आदी गावठी औषधोचार करण्यावर प्रत्येकजणांचा आटापिटा चालू आहे. 

प्रतिकारशक्‍ती वाढवण्यासाठी आर्सेनिक गोळ्या खाणे, स्ट्रीमरचा वापर आदी कानी पडेल त्या पध्दतीचा अवलंब करण्यावर भर असतो. या महामारीचा धोका टाळण्यासाठी बहूतेक घरोघरी ''काढा'' नित्याचाच झाला आहे. कोरोना महामारीचा प्रतिकार करण्यासाठी आता रानात उगवणाऱ्या ''गुळवेल'' अर्थातच ''अमृतवेल'' या वनस्पतीचा वापर होवू लागला आहे. कोरोना महामारीवर गुळवेल (अमृतवेल) जालीम उपाय असल्याचे संकेत मिळाल्यानंतर बहुतेकजण अमृतवेलीच्या काढ्याचा वापर करू लागले आहेत. डिचोलीत सध्या या गोष्टीचा प्रत्यय येत आहे. मागणी असल्याने डिचोलीतील काही दुकानांमधून अमृतवेल विक्रीस उपलब्ध होत असल्याचे आढळून येत आहे. 

राम आणि रावण यांच्या युध्दानंतर देवांचा राजा इंद्रदेव यांनी अमृता पाऊस पाडून युध्दात मारल्या गेलेल्या वानरांना पुर्नजीवन दिले. पुर्नजीवन दिलेल्या वानरांच्या अंगावरील थेंब ज्याठिकाणी पडले, जिथे-जिथे पडले, त्याठिकाणी या गुळवेल (अमृतवेल) वनस्पतीचा उगम झाला. असा संदर्भ आढळतो. गुळवेल अर्थातच अमृतवेल ही वनस्पती रानात मोठ्या झाडावर पसरते. गोव्यातील बहूतेक करुन ग्रामीण भागात ही वनस्पती रानात आढळून येते. महाराष्ट्रात तर ही वनस्पती सर्वत्र आढळते. ही वेल आकाराने मोठी आणि मांसाळ असते. या वेलीवर बारीक छिद्रे आढळून येतात. ही वेल कधीच सुकत नाही. अशी माहिती उपलब्ध झाली आहे. या वेलीच्या गुणधर्माविषयी अनेकांना माहिती नसल्याने पूर्वीपासून विशेष करुन ग्रामीण भागात ही वनस्पती गुरांचे खाद्य म्हणून ओळखण्यात येत होती. सध्या क्‍वचित अपवाद सोडल्यास पूर्वी ग्रामीण भागातील शेतकरी ही वेल कापून गुरांना खायला घालीत होते. आता कोरोना महामारी संकट  काळात या गुळवेल अर्थातच अमृतवेलीला चांगले दिवस आले आहेत.  

आयुर्वेदात महत्व !
आयुर्वेद ही पाच हजार वर्षांपुर्वी वेदिक काळापासून चालत आलेली उपचार पध्दती आहे. आयुर्वेदात गुळवेलीला (अमृतवेल) अनन्यसाधारण महत्व आहे. आयुर्वेदात गुळवेलीचा नैसर्गिक अमृतकुंभ असा उल्लेख बऱ्याच ऋषीमुनींनी केल्याचे आढळते. या वेलीला रसायनकल्पही असे संबोधलं जाते. गुळवेलीच्या पानांमध्ये कॅल्शिअम, प्रोटीन, फॉल्परस हे घटक आढळतात.

तर शिरांमध्ये स्टार्चची मात्राही आढळते. गुळवेल ही फारच औषधी असते. तिचा काढाही परिणामकारक असल्याचा दावा वैद्यांनी केला आहे. काविळसारख्या आजारातून शरीरात आलेला थकवा दूर करण्यात गुळवेल मदत करते. असा दावा आहे.

संबंधित बातम्या