राज्यात चोवीस तासांत कोरोनाचे ५९६ पॉझिटिव्ह रुग्ण; सलग दुसऱ्या दिवशी ८ जणांचा मृत्यू

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 19 सप्टेंबर 2020

आज दिवसभरात १८७३ जणांची चाचणी करण्यात आली. त्यामध्ये ५९६ पॉझिटिव्ह आढळले आहेत, तर त्यातील २४० जणांनी घरी अलगीकरणात उपचार घेत आहेत. घरी अलगीकरणात असलेल्यांची संख्या ११ हजार १६९ झाली आहे.

पणजी: राज्यातील कोरोनाचे मृत्यू प्रमाण रोखण्यासाठी सरकारचे आटोकाट प्रयत्न सुरू असतानाच मागील २४ तासांत ८ जणांचा बळी गेला. त्यामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या ३३५ वर पोहोचली आहे, तर दिवसभरात ५९६ जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. कालच्यापेक्षा आज कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन ती ४७० झाली आहे. 

राज्य आरोग्य सेवा संचालनालयाने जाहीर केलेल्या माहितीनुसार आतापर्यंत २१ हजार ३१४ रुग्णांची प्रकृती बरे होऊन घरी परतले आहेत व कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७७.८ टक्के आहे. आज दिवसभरात १८७३ जणांची चाचणी करण्यात आली. त्यामध्ये ५९६ पॉझिटिव्ह आढळले आहेत, तर त्यातील २४० जणांनी घरी अलगीकरणात उपचार घेत आहेत. घरी अलगीकरणात असलेल्यांची संख्या ११ हजार १६९ झाली आहे. 

राज्यातील कोविड इस्पितळांमध्ये नव्या १८२ जणांना दाखल करून घेण्यात आले आहे. गेल्या २४ तासात झालेल्या ८ जणांच्या मृत्यूमुळे एकूण कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ३३५ झाली आहे. राज्यभरात सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७ हजार २२७ झाली आहे. आज मृत्यू झालेल्यांमध्ये साखळी येथील ५१ वर्षीय पुरुष, वाळपई येथील ३० वर्षीय तरुण व केरी सत्तरी येथील २८ वर्षीय तरुणी, कारवार येथील ६० वर्षीय वृद्धा, बांदोडा - फोंडा येथील ४८ वर्षीय पुरुष, नावेली - सालसेत येथील ३० वर्षीय तरुण, म्हापसा येथील ६८ वर्षीय वृद्ध व ९७ वर्षीय वृद्धा यांचा समावेश आहे. 

आज मृत्यू झालेल्यांमध्ये ३० व त्यापेक्षा कमी वर्षे असलेल्या तिघांचा समावेश आहे. गोमेकॉचे डीन शिवानंद बांदेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आज आठ कोरोनाबाधितांचा  मृत्यू झाला. त्यातील ४ जणांचा गोमेकॉ कोविड इस्पितळ, तर ईएसआय व आझिलो येथे प्रत्येकी दोघांचा मृत्यू झाला. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या