गोवाः पालिका प्रचाराच्या तोफा थंडावल्या

दैनिक गोमंतक
गुरुवार, 22 एप्रिल 2021

म्हापसा, मुरगाव, मडगाव, केपे व सांगे या पाच पालिकांमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरात सुरू असलेला निवडणूक प्रचार आज 23 एप्रिलला संध्याकाळी 5 वाजता संपला.

पणजी: म्हापसा, मुरगाव, मडगाव, केपे व सांगे या पाच पालिकांमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरात सुरू असलेला निवडणूक प्रचार आज 23 एप्रिलला संध्याकाळी 5 वाजता संपला. या निवडणुकीसाठी येत्या 23 रोजी मतपत्रिकेद्वारे सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान तर 26 रोजी मतमोजणी होणार आहे. राज्यात कोविड रुग्णांची तसेच मृत्यूची संख्या दिवसेंदिवस वाढ असल्याने त्याचा परिणाम मतदानावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मडगाव व वास्को पालिकांमध्ये ही लढत प्रतिष्ठेची ठरलेली असल्याने त्याकडे लोकांचे लक्ष लागले आहे. (The corporation cooled the campaign)

गोवा: कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात आजपासून संचारबंदी लागू

आरक्षण व फेररचनेमुळे वादग्रस्त ठरलेल्या या पाच पालिकांमध्ये 402 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. काँग्रेस, भाजप, गोवा फॉरवर्ड या राजकीय पक्षांचा पाठिंबा असलेले पॅनल या निवडणुकीत आहेत. मडगाव पालिकेत विरोधी पक्षनेते दिगंबर कामत तसेच गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रमुख विजय सरदेसाई तसेच काँग्रेस आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी एकत्रित पॅनल उभे करून भाजपप्रणीत उमेदवार पॅनलसमोर मोठे आव्हान समोर ठेवले आहे. अनेक वर्षे कामत व सरदेसाई यांच्या गटातीलच नगरसेवक बहुमताने निवडून येत असून अजून एकदाही भाजपसमर्थक गटाला बाजी मारता आलेली नाही. या पाच पालिकांसाठी 402 उमेदवारांचे भवितव्य 1 लाख 85 हजार 225 मतदार ठरवणार आहेत.

संबंधित बातम्या